Latur Dust index : लातूर शहरात धुळीच्या निर्देशांकांची पातळी खाली

लातूर शहरातील हवेतील धुलीकणाचे अर्थात धुळीचे प्रमाण कमी झाले आहे.
Latur city Duse Level
Latur city Duse Levelsakal

लातूर - शहरातील हवेतील धुलीकणाचे अर्थात धुळीचे प्रमाण कमी झाले आहे. देशाची राजधानी दिल्लीत वायु प्रदूषणाचे संकट कायम असताना लातूर शहरातील स्थिती बदलत आहे. शहरात वर्ष २०१६ मध्ये हवेतील धुळीच्या प्रदूषणाचा निर्देशांक ३९० म्हणजे सध्या दिल्लीत असलेल्या प्रदूषणापेक्षा खूप खराब होता. सात वर्षात हे चित्र बदलले आहे.

सध्या शहराचा निर्देशांक चक्क ७६ आहे. गेल्या काही वर्षात वृक्ष लागवड व संवर्धनासाठी केलेल्या कार्याचा हा परिणाम असल्याचा दावा ग्रीन लातूर वृक्ष टीमने केला असला तरी हवा प्रदूषणाच्या बाबतीत ही बाब लातूरकरांना निश्चितच सुखावणारी आहे.

हवेतील प्रदूषणाचे मोजमाप हे वायु गुणवत्ता निर्देशांकाने केले जाते. एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) हे हवा प्रदूषणाचे हे प्रमाण आहे. गेल्या काही वर्षात राष्ट्रीय राजधानीत नेहमीच एक्यूआय वाढल्यामुळे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. यामुळे विविध प्रश्न निर्माण झाले असून नागरिकांचा श्वास कोंडत आहे.

या विषयावर सर्वच ठिकाणी चर्चा सुरू असून सर्वोच्च न्यायालयानेही याची गंभीर दखल घेतली आहे. या स्थितीत लातूरचाही एक्यूआय २०१६ मध्ये वाढून ३९० पर्यंत पोहचला होता. २०१६ मध्ये शहर ओसाड, भकास व उजाड होते. शहरात वृक्षांची संख्या दुर्मीळ होती. यातूनच हवेतील प्रदूषणाचा निर्देशांक ३९० म्हणजे अति धोकादायक स्थितीत होतात. दिवसभरात घातक धूळ लातूरकरांच्या शरीरात जात होती.

त्या वेळी केंद्र सरकारने चिंता व्यक्त करून उपाययोजना करण्याची सूचना केली होती. काही वर्षात हळूहळू चित्र बदलत गेले. शहरातील वृक्षलागवड व संवर्धनासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या छताखाली अनेक हात एकवटले. अनेक प्रतिकूल परिस्थितीत या हातांनी एकमेकांचा हात न सोडता वृक्ष लागवड व संवर्धनाच्या कार्यावरील पकड ढिली होऊ दिली नाही. या कामात सातत्य ठेवले.

यातूनच नागरिकांमध्येही जनजागृती झाली व झाडाप्रति आपुलकी निर्माण झाली. अखंड वृक्षलागवड, वृक्ष संगोपन व जनजागृतीतून चित्र बदलत गेले. या कार्यात अनेक कार्यकर्ते व संघटनांनी योगदान दिले. यामुळे सध्या एक्यूआय ७६ आहे. शहर यलो झोन मधून ग्रीन झोनमध्ये आले आहे.

वृक्षतोडीला लगाम

पाच वर्षांत शहर व परिसरात ग्रीन वृक्ष लातूर टीमने दोन लाखांहून अधिक झाडे लावून त्यांना बारा महिने पाणी त्यांचे संवर्धन केले. वृक्षतोडीवर बारीक लक्ष ठेवले. शहरातील वृक्षांना कोणीही इजा पोहचवणार नाही, याची काळजी घेतली. अगदी वृक्षांना खिळे मारणारे हातही टीमने रोखून धरले. याचा परिणाम शहरातील वृक्षांना चांगलेच संरक्षण मिळाले व त्यांची वाढ झाली. वाळवंटात चांगले नंदनवन फुलल्याचा प्रत्यय सर्वांना येत असल्याचे टीमचे डॉ. पवन लड्डा यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com