लातूर शहरातील शाळांना डेडलाईन

लातूर - शाळांनी शालेय परिवहन समितीची स्थापना करावी, यासाठी प्रादेशिक परिवहन समितीतर्फे प्रत्येक तालुक्‍यात मुख्याध्यापकांसाठी प्रबोधन शिबिर घेतले जाणार आहे. याची सुरवात उदगीरमध्ये शुक्रवारी झाली.
लातूर - शाळांनी शालेय परिवहन समितीची स्थापना करावी, यासाठी प्रादेशिक परिवहन समितीतर्फे प्रत्येक तालुक्‍यात मुख्याध्यापकांसाठी प्रबोधन शिबिर घेतले जाणार आहे. याची सुरवात उदगीरमध्ये शुक्रवारी झाली.

लातूर - शालेय परिवहन समिती स्थापन करून त्याची ऑनलाइनपद्धतीने नोंद करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शहरातील शाळांना १५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर मात्र शाळांबरोबरच नोंद नसणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅन चालकाविरोधात कडक पावले उचलत त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय विचाराधीन आहे.

शाळा सुरू होऊन चार महिने उलटले तरी शहरातील एकाही शाळेने शालेय परिवहन समिती स्थापन केली नसल्याचे ‘सकाळ’ने नुकतेच उघडकीस आणले होते. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा महत्त्वाचा प्रश्‍न बनलेला असतानाही शाळा याकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शहरातील आणि जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांची एकत्रित बैठक घेऊन समितीची आवश्‍यकता का आहे, याचे महत्त्व पटवून दिले. तरीही शहरातील एकाही शाळेने समिती स्थापन करून त्याची ऑनलाइन नोंद केली नाही. या बाबी लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शहरातील शाळांना १५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीत समितीची स्थापना करून त्याची ऑनलाइन नोंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सर्वाधिक शाळा लातूर शहरात आहेत. त्यामुळे पुढील आठ दिवसांच्या कालावधीत शहरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची आणखी एकदा बैठक बोलावण्यात येणार आहे. त्यात त्यांना परिवहन समितीची आवश्‍यकता पटवून दिली जाईल. शिवाय, स्कूल बस आणि स्कूल व्हॅनमध्ये महिला 
मदतनीस नेमणे अनिवार्य असल्याचेही सांगितले जाणार आहे.
- संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

आता प्रत्येक तालुक्‍यात प्रबोधन
शालेय परिवहन समितीत कोण- कोण असावेत, ही समिती स्थापन केल्यानंतर त्याची माहिती ऑनलाइनपद्धतीने भरायची कशी, या संदर्भातील माहिती लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात जाऊन तेथील मुख्याध्यापकांना देण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतला आहे. याची सुरवात उदगीरमधून शुक्रवारी (ता. १९) करण्यात आली. या प्रबोधन वर्गाला ३७० शाळांतील ३२५ मुख्याध्यापक उपस्थित होते. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड, मोटार वाहन निरीक्षक संदीप शिंदे यांनी मुख्याध्यापकांना स्कूल बस सुरक्षितता आणि वाहतूक नियमावलीची माहिती दिली. याबरोबरच उदगीर तालुक्‍यातील सर्व शाळांना २४ ऑक्‍टोबरपर्यंत समितीची नोंद करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.      
इथे करा नोंद ः www. choolbussafetylatur.org

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com