Latur News : लातूरमध्ये आठ वर्षांत दुसरा ग्रीन कॉरिडॉर; पहिला झाला तरुणाच्या अवयवदानासाठी, आता आयुक्तांच्या उपचारासाठी
Medical Transfer : लातूरमध्ये आठ वर्षांत दुसऱ्या ग्रीन कॉरिडॉरची निर्मिती झाली आहे. या ग्रीन कॉरिडॉरमुळे आयुक्त मनोहरे यांना मुंबईत उपचारासाठी नेण्यासाठी वेळेवर सुविधा मिळाली.
लातूर : येथील महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यासाठी सोमवारी (ता. सात) येथे ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता. याकरिता सह्याद्री रुग्णालय ते विमानतळ हा सतरा किलोमीटरच्या अंतरावर ‘नो मॅन्स लॅण्ड’ करण्यात आले होते.