esakal | पाचशे रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापकाला पकडले,एसीबीची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

2Bribe_3.jpg

पाचशे रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापकाला पकडले,एसीबीची कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चाकूर (जि.लातूर) : जानवळ (ता.चाकूर) Chakur येथील जिल्हा परिषद शाळेतील Latur Zilla Parishad माजी विद्यार्थ्याला सातवीची गुणपत्रिका देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता.आठ) दुपारी तीन वाजता अटक केली. बालाजी रामचंद्र भिंगोले (वय ५५) असे संशयिताचे नाव आहे. जानवळ येथील एक तरुण गावातील जिल्हा परिषद केंद्रीय Latur प्राथमिक शाळेतून सातवी उत्तीर्ण झाला. या तरुणाला काही कामानिमित्त सातवी उत्तीर्णची गुणपत्रिका हवी होती. latur crime news headmaster cought acb trap for taking five hundred bribe in chakur

हेही वाचा: Aurangabad: पिकांमध्ये निलगायींचे धुडगूस, शेतकऱ्यांमध्ये दहशत

मुख्याध्यापक भिंगोले हा गुणपत्रिका देण्यासाठी टाळाटाळ करीत होता. यासाठी पाचशे रुपये द्यावे लागतील, अशी मागणी मुख्याध्यापकाने संबंधित तरुणाकडे केली. त्यानंतर तरुणाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास मुख्याध्यापक भिंगोले याला तक्रारदाराकडून पाचशे रुपयाचा लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. पोलिस निरीक्षक बाबासाहेब काकडे, कुमार दराडे यांच्या नेतृत्वात पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

loading image