उदगीरात अनाधिकृत टिप्पर, ट्रक तोडणाऱ्या दुकानावर छापा; गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ

Udgir Crime News
Udgir Crime News
Updated on

उदगीर(जि.लातूर) : शहरातील नांदेड रस्त्यालगत असलेल्या एका गॅरेजच्या पाठीमागे अनाधिकृत टिप्पर व ट्रक तोडून बंगारला इतर जिल्ह्यात नेऊन विक्री करण्यात येत असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यावरूनपोलिसांनी छापा टाकला. तोडण्यात आलेले टिप्पर, ट्रक सांगाडे व तोडत असलेली ट्रक तेथे दिसून आली. यासह तोडलेल्या वाहनांची लाखो रुपयांचे साहित्य तेथे आढळून आले. मात्र हे पथक कुठेलीच कारवाई न करता परत आले. यामुळे शहरात या घटनेची उलटसुलट चर्चा चालू झाली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की बुधवारी (ता.सात) ग्रामीण पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास नांदेड रस्त्यावरील एका गॅरेजच्या पाठीमागे जागेत छापा टाकला. तेथे तोडलेला टिप्पर, ट्रकचा सांगाडा उभा होता. तोडण्यात येत असलेली ट्रक तेथे दिसून आली. याशिवाय अशा प्रकारे तोडलेले लाखो रुपयांचे साहित्य आढळून आले. या ठिकाणी बाहेर जिल्ह्यात विक्रीसाठी हे साहित्य, भंगार मोठ्या ट्रकमध्ये भरून पाठवण्यात येत होते. या सर्व साहित्याची पाहणी या पथकाने केली. मात्र यांच्यावर कसलेही स्वरूपाची कार्यवाही सायंकाळीपर्यंत करण्यात न आल्याने शहरात या घटनेची उलट-सुलट चर्चा चालू झाली आहे. या पथकात ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक घारगे, कर्मचारी, इतर काही पोलीस असा मोठा फौजफाटा असताना हे पथक परत का गेले? असा प्रश्‍न शहरातील नागरिक उपस्थित करत आहेत. 


शहर व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रक, टिप्पर चोरीच्या घटना घडल्या असून त्या संबंधित गुन्हे अनेक पोलिस ठाण्याला दाखल आहेत. शहरातील या गॅरेजच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर ट्रक, टिप्पर तोडण्यात येत असल्याचे रंगेहाथ पकडूनही पोलिसांनी कारवाई केली नाही? या वाहनांना तोडण्याचा प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांचा परवाना लागतो तो परवाना यांच्याकडे मिळून आलेला नव्हता. तरीही कारवाई का झाली नाही? हे न उकलणारे गुड आहे. पोलिस यंत्रणा मॅनेज झाली की यंत्रणेवर कोण्या राजकारण्यांनी दबाव आणला? याची चर्चा सुरु झाली आहे.

याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की ट्रक, टिप्परची तोड करण्यात आलेल्या प्रकरणात संबंधितांकडून कागदपत्रे मागवण्यात आले आहेत.त्याची पडताळणी करण्यात येणार आहे. याबाबत सायंकाळी सात वाजेपर्यंत या प्रकरणात कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याच्या पार्श्वभूमीवर उदगीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की याबाबतीत मी संबंधित पोलिस निरीक्षकांची बोललो ते अधिक चौकशी करत आहेत असे सांगितले. या प्रकरणात काही संशयास्पद घडल्यास त्याची चौकशी करुन कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Senior Congress Leader Shriram Patil Rajurkar Passes Away
Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.
Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.
Marathi News Esakal
www.esakal.com