
जिल्हा पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी पदभार घेतल्या पासुन मटका काही प्रमाणात कमी झाला होता. आता मटका औशात पुन्हा जोरात सुरु झाला आहे.
औसा (जि.लातूर) : जिल्हा पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी पदभार घेतल्या पासुन मटका काही प्रमाणात कमी झाला होता. आता मटका औशात पुन्हा जोरात सुरु झाला आहे. जिल्ह्यातील मटके बहाद्दरांच्या बंदोबस्तासाठी जिल्हा पोलिस अधिक्षकांनी स्थापन केलेल्या पथकाने बुधवारी सायंकाळी औशात छापे टाकत 1 लाख 45 हजारांच्या मुद्देमालासह 35 हजार रोख रक्कम जप्त केली आहे.
तीन आरोपींसह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याअगोदर औसा पोलिस मुख्य मटका बुकीपर्यंत पोहोचतच नव्हते. मात्र बुधवारच्या पोलिस अधिक्षकांच्या पथकाने मुख्य बुकींनाच जेरबंद केले आहे. यामुळे औशाचे पोलिस कितीजरी मटका बंद आहे असे सांगत असले तरी पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने त्यांचे पितळ उघडे केले आहे.
Gram Panchayat Election: तिरंगी लढतीत सत्तेच्या चाव्या कुणाला मिळणार?
विशेष बाब म्हणजे या मटकाबहाद्दरांवर कारवाई करण्यात आल्यानंतर संध्याकाळी पोलिस अधिक्षक निखील पिंगळे हे औसा पोलिस ठाण्यात आले होते. त्यांच्या निदर्शनास ही बाब असल्याने आता पोलिस अधिक्षक येथील कारभाऱ्यावर काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने औशातील मटक्यावर बुधवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास छापे मारले. यात धनंजय नरसिंग कुंभार उंबडगा रोड औसा, आकाश शिवशंकर कुरसुळे हाश्मी नगर औसा यांच्याकडून मटक्याचे साहीत्यासह मोबाईल, एक स्कुटी असा एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल व पस्तिस हजार रुपये रोख रक्कम असा एकुण एक लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करुन या दोघांविरोधात गजानन क्षिरसागर पोलिस उपनिरिक्षक निलंगा पोलिस स्टेशन यांच्या फिर्यादीवरुन महाराष्ट्र जूगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटनेचा तपास एम.एस. औटे हे करीत आहेत. तर दुसऱ्या कारवाईत औसा पोलिसांकडून मुक्तेश्वर विश्ननाथ तेलंगे लेंडी गल्ली औसा यांना फिरुन मोबाईलवर मटका घेत असतांना पकडण्यात आले त्याच्याकडून मोबाईल व दोनशे विस रुपये जप्त करण्यात आले. फिर्यादी राहूल डांगे पोलिस कॉंन्टेबल यांच्य फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास आर.जे. चव्हाण हे करीत आहेत.
ईमेल हॅक करून लाखोंचा गंडा, वाळूजमधील वर्षा फोर्जिंग कंपनीची फसवणूक
मटका बुकींवर कारवाई झाल्यावर संध्याकाळी पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे हे औसा पोलिस ठाण्यात आले होते. त्यांच्या समोरच हा प्रकार उघडकीस आल्याने औसा पोलिस ठाण्याच्या प्रमुखांचा कारभार उघडा पडला.
शिस्तप्रिय आणि कामात चुका करनाऱ्यांचा कर्दनकाळ असलेले पोलिल अधिक्षक आता औसा पोलिस निरिक्षकावर काय कारवाई करतात याकडे औसेकरांचे लक्ष लागले आहे. पोलिस अधिक्षकांच्या पथकाच्या या कारवाईत औ शातील मोठे मटकाकिंग पोसिलांच्या हाती लागले असुन आता औशातील मटका बंद होतो की पुन्हा सुरु राहतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
(edited by- pramod sarawale)