Latur Crime: इंस्टाग्रामवर धारधार शस्त्र बाळगुन रील बनवणारे दोघे ताब्यात

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांची कार्यवाही
Latur Crime: इंस्टाग्रामवर धारधार शस्त्र बाळगुन रील बनवणारे दोघे ताब्यात

Udgir Crime: सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता सुरु असुन पोलीस विभागाकडून समाज माध्यमांवर करडी नजर ठेवली जात आहे.

त्यातच इंस्टाग्रामवर धारदार शस्त्र बाळगून रील बनवणाऱ्या एकावर व इंस्टाग्रामवर धारदार तलवार बाळगून प्रदर्शन करणाऱ्या एका अशा दोघा जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latur Crime: इंस्टाग्रामवर धारधार शस्त्र बाळगुन रील बनवणारे दोघे ताब्यात
Nashik Crime News : अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्यांची धरपकड; आठवड्यात शहरातून 24 संशयितांना अटक

याबाबत ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चालू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी इंस्टाग्राम, व्हाट्सअप, फेसबुक व अन्य समाज माध्यमांवर पोलीस विभागाकडुन करडी नजर ठेवली जात आहे.

त्यातच इंस्टाग्राम वर घातक शस्त्र बाळगून दहशत निर्माण करून रील बनवणाऱ्या अमोल सुधाकर बिरादार (रा.वलांडी, ता.देवणी) यास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाने पशुवैद्यक महाविद्यालय परिसरात ताब्यात घेऊन त्याच्याकडून धारदार चाकू जप्त केला आहे. या पथकात पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले, राम बनसोडे, संतोष शिंदे, नामदेव चेवले यांचा समावेश होता

Latur Crime: इंस्टाग्रामवर धारधार शस्त्र बाळगुन रील बनवणारे दोघे ताब्यात
Nashik Crime News : आजीबाई ओरडल्याने पकडला सोनसाखळी चोरटा; नागरिकांना दिला चोप

उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या पथकाने रविवारी (ता.२४) रोजी इंस्टाग्राम वर फोटो ठेवून दहशत निर्माण करणाऱ्या राजकुमार ज्ञानोबा आलावाड (रा.गोपाळ नगर) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन तलवारी व एक कोयता जप्त केला आहे.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक श्री कुलकर्णी, श्री केंद्रे, श्री बिरादार, श्री गेडाम, राहुल गायकवाड यांचा समावेश होता. महाराष्ट्र अधिनियम कायदे अंतर्गत दोघांवरील ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latur Crime: इंस्टाग्रामवर धारधार शस्त्र बाळगुन रील बनवणारे दोघे ताब्यात
Nagpur Crime: बँक व्यवस्थापकाच्या घरात जबरदस्ती शिरला ३१ वर्षीय तरुण अन्...धंतोलीतील थरारक घटना

युवकांनो सावधान रहा... पोलिसांची समाज माध्यमावर नजर आहे. सध्या आचारसंहिता व निवडणुकीचा काळ आहे. कायद्यानुसार घालून दिलेल्या चौकटीत राहून आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वांनी करायचा आहे. आचारसंहितेचा भंग होईल असे कुठलेच कृत्य युवकांनी करू नये.

वेळ आढळल्यास कारवाई निश्चितपणे होणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदर्श आचारसंहिता पालन निमित्त केलेल्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख व ग्रामीण पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी केले आहे.

Latur Crime: इंस्टाग्रामवर धारधार शस्त्र बाळगुन रील बनवणारे दोघे ताब्यात
Dhule Crime News : किराणा दुकानदाराच्या घरावर छापा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com