CORONA : चाकूर शहरात कोरोनाचा पहिला बळी; आज १८ बाधितांची वाढ  

प्रशांत शेटे 
Friday, 7 August 2020

आर. बी. पाटील नगरातील ६० वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी (ता. ७) सकाळी येथील कोव्हीड केअर सेंटर मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

चाकूर (लातूर) : शहरातील आर. बी. पाटील नगरातील ६० वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी (ता. ७) सकाळी येथील कोव्हीड केअर सेंटर मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आज १८ नवीन रुग्ण आढळले असून तालूक्यातील कोरोना बांधीतांची संख्या १५२ वर गेली. 
 नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

सदरील मृत व्यक्तीची गुरूवारी (ता.६) दुपारी रॅपिट अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली होती. यात पॉझिटीव्ह आल्यामुळे येथील कोव्हीड सेंटर मध्ये त्यांच्यावर उपचार केले जात होते. शुक्रवारी सकाळी ह्दयविकारामुळे त्यांचे निधन झाले असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिपक लांडे यांनी दिली. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. तालूक्यात नळेगाव व चाकूर हे प्रत्येकी एका व्यक्तींचा कोरोनामुळे बळी गेला आहे. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

आठ दिवसात वाढले रूग्ण 
प्रशासनाच्या वतीने अंत्यसंस्कारासाठी गर्दी करू नका असे आवाहन केले जात असतानाही मागील आठवड्यात नळेगाव येथील एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी तीनशेच्या जवळपास व्यक्ती जमा झाल्या होत्या. यातून अनेकांना कोरोनाचा संसंर्ग झाला. एकट्या नळेगाव गावात ५७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

यामुळे तालूक्यातील कोरोना बाधीतांची संख्या १५२ वर गेली आहे. यापैकी ८९ रुग्ण येथील कोव्हीड सेंटर मध्ये उपचार घेत आहेत. तर ९ जणांना लातूर येथे पाठविण्यात आले आहे. वाढती संख्या लक्षात घेऊन कोव्हीड सेंटरची क्षमता २५० खाटाची करण्यात आली आहे, असे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी सांगीतले. 

संपादन-प्रताप अवचार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur District Chakur city corona Update today one death and 18 new patient