esakal | आनंदाची बातमी...! लातूर जिल्हा झाला 'कोरोनामुक्त'
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचार घेत असलेल्या आठही परप्रांतीय कोरोनाबाधीत रुग्णांचा अंतिम तपासणी अहवाल अखेर निगेटिव्ह आला. या अहवालामुळे लातूरकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला. या सर्व रुग्णांना लगेचच घरीही सोडण्यात आले. या अहवालानुसार लातूर जिल्हा आता कोरोनामुक्त झाला असून या जिल्ह्याने आता 'ग्रीन झोन"मध्ये पाऊल टाकले आहे.

आनंदाची बातमी...! लातूर जिल्हा झाला 'कोरोनामुक्त'

sakal_logo
By
सुशांत सांगवे

लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचार घेत असलेल्या आठही परप्रांतीय कोरोनाबाधीत रुग्णांचा अंतिम तपासणी अहवाल अखेर निगेटिव्ह आला. या अहवालामुळे लातूरकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला. या सर्व रुग्णांना लगेचच घरीही सोडण्यात आले. या अहवालानुसार लातूर जिल्हा आता कोरोनामुक्त झाला असून या जिल्ह्याने आता 'ग्रीन झोन"मध्ये पाऊल टाकले आहे.

हरियाणा राज्यातील नुह जिल्ह्यातील फिरोजपुर झिरका येथे गेल्या तीन महिन्यांपासून धार्मिक कार्यासाठी वास्तव्यास असलेले बारा यात्रेकरू २ एप्रिलच्या मध्यरात्री  लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील एका धार्मिक स्थळी आढळून आले. या बारा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठवले असता त्यातील 8 जणांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

या सर्वांची वेळोवेळी तपासणी करण्यात आली. शिवाय, हे रुग्ण आणखी कोणाकोणाच्या संपर्कात आले, याचाही शोध घेण्यात आला. संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला. त्यांनतर आता 8 कोरोनाबाधित रुग्णांचा अंतिम तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

आई गेल्याचं दुःख मोठं, पण गोडजेवण घालण्याऐवजी यांनी...

सोलापुरातील लॅबमधून शनिवारी (ता. 18) रात्री हा अहवाल प्राप्त झाला. याबाबतची अधिकृत घोषणा पालकमंत्री अमित देशमुख यांनी आपल्या ट्विटर वरून केली आहे. लातूर आता कोरोनामुक्त झाले आहे. खरंतर लातूर आधीपासूनच कोरोनामुक्त आहे, असेही देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

लातुरातील आठही रुग्णांचा अहवाल अखेर निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या सर्वांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या लातुरात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही.
- डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था

loading image