लातूर जिल्ह्यात 83 टक्के पाऊस, अहमदपूर, जळकोट तालुक्‍यांत पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

लातूर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाच्या टक्केवारीतही चांगलीच वाढ झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 802.13 मिलिमीटर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 667.08 मिलिमीटर पाऊस झाला असून त्याची टक्केवारी 83.16 इतकी आहे. जिल्ह्यात अहमदपूर आणि जळकोट तालुक्‍यात मात्र शंभर टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. 

लातूर, ता. 22 ः लातूर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाच्या टक्केवारीतही चांगलीच वाढ झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 802.13 मिलिमीटर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 667.08 मिलिमीटर पाऊस झाला असून त्याची टक्केवारी 83.16 इतकी आहे. जिल्ह्यात अहमदपूर आणि जळकोट तालुक्‍यात मात्र शंभर टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

 
यावर्षी पहिल्यापासून पाऊस लातूर जिल्ह्याला हुलकावणी देत आहे; पण परतीच्या पावसाने लातूरकरांवर असलेले चिंतेच ढग मात्र बाजूला सारले. गेल्या तीन-चार दिवसांत सर्वच तालुक्‍यांत दमदार पावसाने हजेरी लावली. त्याचा परिणाम म्हणून "मांजरा', "तावरजा' यांसोबतच जिल्ह्यातील लहान-मोठ्या नद्यांना पाणी आले. नाल्यांचे खोलीकरण झालेल्या ठिकाणी त्याचा मोठा फायदा झाला; तसेच जिल्ह्याच्या सरासरी पावसावरही परिणाम झाला.

जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 802.13 मिलिमीटर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 667.08 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अहमदपूर आणि जळकोट तालुक्‍यात तर शंभर टक्के पाऊस झाला आहे. अहमदपूर तालुक्‍याची पावसाची वार्षिक सरासरी 833.40 मिलिमीटर इतकी असून, आजपर्यंत 856 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

त्याची टक्केवारी 109.13 इतकी आहे. तर जळकोट तालुक्‍याची पावसाची सरासरी 902.80 मिलिमीटर इतकी असून आतापर्यंत 936 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याची टक्केवारी 110.16 इतकी आहे. इतर तालुक्‍यांतही चांगला पाऊस झाला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur district receives 83 percent rainfall