esakal | लातूर विभागीय मंडळच "प्रभारी'
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिकात्मक छायाचित्र

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या येथील विभागीय मंडळाचा कारभार मागील काही महिन्यांपासून प्रभारी अधिकाऱ्यांवरच सुरू आहे. मंडळाचे प्रमुख अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर राज्य सरकारने रिक्त पदांवर कोणाचीच नियुक्ती केलेली नाही. शिक्षण विभागातील स्थानिक अधिकाऱ्यांकडेच पदभार सोपविल्याने हेच अधिकारी मंडळाचे कामकाज चालवत आहेत. 

लातूर विभागीय मंडळच "प्रभारी'

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या येथील विभागीय मंडळाचा कारभार मागील काही महिन्यांपासून प्रभारी अधिकाऱ्यांवरच सुरू आहे. मंडळाचे प्रमुख अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर राज्य सरकारने रिक्त पदांवर कोणाचीच नियुक्ती केलेली नाही. शिक्षण विभागातील स्थानिक अधिकाऱ्यांकडेच पदभार सोपविल्याने हेच अधिकारी मंडळाचे कामकाज चालवत आहेत. 


मंडळाचे विभागीय सचिव शशिकांत हिंगोणेकर हे एप्रिलमध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांचा पदभार मंडळातील सहसचिव एन. के. देशमुख यांच्याकडे देण्यात आला. श्री. देशमुख हे जूनमध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांच्याकडे त्यांचा पदभार देण्यात आला.

यात मंडळाचे अध्यक्ष महेश करजगावकर हे जुलैअखेर सेवानिवृत्त झाले. त्यांचा पदभार येथील शिक्षण उपसंचालक संजय यादगिरे यांच्याकडे सोपविण्यात आला. सध्या मंडळात सहायक सचिव या पदावर संजय पंचगल्ले हे एकमेव नियमित अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सहसचिवांचे पद रिक्त असून सचिव आणि अध्यक्ष प्रभारी आहेत. 

साहेब गेले बोर्डात 
संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी; तसेच त्यांच्या संघटना आणि पदाधिकाऱ्यांची माध्यमिक शिक्षण विभाग; तसेच उपसंचालक कार्यालयात सतत वर्दळ असते. कार्यालयात बसून काम करताना अधिकाऱ्यांना कसरत करावी लागते. यामुळे दोन्ही प्रभारींना मंडळाचे चांगले कार्यालय उपलब्ध झाले आहे. दोन्ही अधिकारी बहुतांश वेळ मंडळाच्या कार्यालयात बसूनच काम करताना दिसत असून त्यांच्या कार्यालयातून "साहेब बोर्डात गेल्या'चा निरोप लोकांना मिळत आहे. 

loading image
go to top