लातूर : शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक हालचाली

एक ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी, पदवीधर मतदारसंघासाठीही नव्याने याद्या
Latur Election Commission
Latur Election Commissionsakal

लातूर : निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यातूनच दोन्ही मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला असून येत्या एक ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी सुरू होणार आहे. एक नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकावर ही यादी तयार करण्यात येणार असून नाशिक व अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर, कोकण शिक्षक मतदारसंघासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या तयारीनुसार जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये या पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दर सहा वर्षानी होणाऱ्या विधान परिषद सदस्यत्वासाठीच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांसाठी नवीन मतदार यादी तयार करण्यात येते. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून सहा महिन्यापू्र्वीपासूनच तयारी सुरू केली जाते.

निवडणुकीची पहिली पायरी म्हणून मतदार यादीचे काम हाती घेण्यात येते. त्यासाठी मुदत संपणाऱ्या मतदारसंघाच्या मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात येतो. तो आयोगाने जाहीर केला असून एक ऑक्टोबरला कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध होणार आहे. याच दिवसापासून पदवीधर व शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी सुरू होणार आहे. ७ नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर १९ नोव्हेंबरपासून प्रारूप मतदार यादीची छपाई हाती घेण्यात येणार असून २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

डिसेंबरमध्ये अंतिम यादी

मतदार यादीवर २३ नोव्हेंबर ते नऊ डिसेंबर या काळात दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. २५ डिसेंबरला दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करून त्यांची छपाई करण्यात येणार आहे. त्यानंतर ३० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२३ मध्ये केव्हाही निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com