चाकूर (लातूर): कोरोना रुग्णांची संख्या २५ पेक्षा जास्त झाल्यानंतर त्या गावातच संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू करावा. कोरोनामुक्त गाव अभियान राबवून शासनस्तरावर त्या गावांना पुरस्काराने सन्मानित करावे, अशा सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर आरोग्य व जिल्हा प्रशासन यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी (ता.१६) सकाळी येथील कृषी महाविद्यालयातील कोरोना केअर सेंटरला भेट दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना उपलब्ध आरोग्य सुविधा व उपाययोजना याची पाहणी करून माहिती घेतली.
यानंतर देशमूख यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तालुक्यातील रुग्ण तपासणी संख्या कमी असून तपासणीचा वेग वाढवावा. परवानगी नसताना व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करावी, तालुक्याच्या ठिकाणी किमान १०० खाटाचे रुग्णालय असावे. याकरिता प्रस्ताव तयार करावा, एकूण बाधित रुग्णांची विविध घटकातील वर्गवारी काढून त्या - त्या घटकात जनजागृती करावी, २५ रुग्णांच्यावर रुग्ण असलेल्या गावात संस्थात्मक विलगिकरण कक्ष सुरू करावा अशा सूचना पालकमंत्री श्री. देशमुख यांनी केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश हरिदास, गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.