esakal | विजेची साडेसहा हजार कोटींची थकबाकी, महावितरणचे पथक लातुरात दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Latur Latest News

गेल्या काही दिवसांपासून एक तर विजेचे पैसे भरा; अन्यथा वीज जोडण्या खंडित करा असा पवित्रा महावितरणतर्फे घेण्यात आलेला आहे.

विजेची साडेसहा हजार कोटींची थकबाकी, महावितरणचे पथक लातुरात दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : महावितरणच्या लातूर परिमंडलात घरगुती, वाणिज्यक, औद्योगिक व कृषी वर्गवारीतील ग्राहकांकडे महावितरणचे ६ हजार ५६७ कोटी रुपये थकले आहेत. मागील लॉकडाउनच्या दहा महिन्यांच्या काळात ग्राहकांनी विजेचे बिल भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने थकबाकीत अनेकपटीने वाढ झाली. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणच्या आर्थिक संकटात वाढ झाली आहे. वसुलीशिवाय पर्याय राहिला नाही. या पार्श्वभूमीवर महावितरण मुख्यालयाने वाणिज्य विभागाचे संचालक सतीश चव्हाण आणि मुख्य महाव्यवस्थापक भरत जाडकर यांच्या विषेश पथक येथे दाखल झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून एक तर विजेचे पैसे भरा; अन्यथा वीज जोडण्या खंडित करा असा पवित्रा महावितरणतर्फे घेण्यात आलेला आहे. शनिवारी (ता. १३) श्री. जाडकर यांनी संबंधित अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंत्यांच्या झाडाझडती घेतली. अधिकच्या थकबाकीदार ग्राहकांच्या नावानिशी माहिती घेत बिल कधी भरले, न भरले असल्यास जोडणी खंडित केली का? केली असा अहवाल दिला गेल्यास त्याची प्रत्यक्ष ग्राहकांच्या दारात जाऊन खातरजमा करण्यास त्यांनी प्रारंभ केला. थेट मुख्यालयस्तरावरून वीज जोड तोडणीची खातरजमा केली जात असल्याने महावितरणची स्थानिक यंत्रणेकडून आता विजेच्या जोडण्या खंडित करण्याची कारवाई केली जात आहे.


संचालक आज लातुरात
लातूर परिमंडळात विजेची थकबाकी वाढत चालली आहे. मुख्य महाव्यवस्थापकानंतर आता सोमवारी (ता. १५) महावितरणचे वाणिज्यक संचालक सतीश चव्हाण लातुरात दाखल होत आहेत. वसुलीचा ते आढावा घेणार आहेत. थकबाकीदारांचा पुरवठा खंडित करण्याच्या कारवाईचा आढावा घेऊन कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top