esakal | जळकोट तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू

बोलून बातमी शोधा

gharkul yojna}

रमाई अवास घरकुलासह इतर विविध योजनेतून शासनाकडून गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजना दिली जाते

जळकोट तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू
sakal_logo
By
शिवशंकर काळे

जळकोट (लातूर): तालुक्यातील पंचायत समितीकडून शासनाच्या विविध योजनेतून घरकुल मंजूर झालेल्या पाचशे लाभार्थ्यांना अडीच हजार ब्राॅस मोफत वाळू दिली जाणार आहे. ही माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांनी बुधवारी दिली.

रमाई अवास घरकुलासह इतर विविध योजनेतून शासनाकडून गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजना दिली जाते. शासनाने दिलेल्या रक्कमेत या घरकुलाचे बांधकाम पूर्ण होत नाहीत त्यासाठी लाभार्थ्यांना विविध अडचणीला तोड द्यावे लागत असल्याचे दिसत आहे. पण आता जळकोट पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील घरकुल मंजुर झालेल्या लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकामास भेटी देऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत कोणत्या लाभार्थ्यांच्या घराचे किती बांधकाम झाले यांचा सर्व्हे करुन त्यांचा अहवाल तयार करण्यात आला.

धक्कादायक! लहान मुलास जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार, घाबरल्याने...

दरम्यान घरकुल मंजूर झालेल्या एका लाभार्थ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार मोफत वाळू देण्यासाठी जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांनी तालुक्यातील वाळूचे ठिकाण ठरवून दिल्यानंतर त्या जागेवरील वाळू घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना ठरवून दिलेल्या ठिकाणी स्वतःचे भाड्याचे वाहन घेऊन ते आणावयाचे आहे.या उपक्रमाचा अनेक गरजू घरकुल लाभार्थ्यांना फायदा होणार आहे.

हिंगोलीत २४ केंद्रांतर्गत नऊ हजार जणांचे कोरोना लसीकरण

तालुक्यात सध्या ४७५ घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहेत. यातील अनेकांनी घरकुलाचे बांधकाम चालु केले आहेत. शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे एका लाभार्थ्यांना मोफत अडीच ब्राॅस वाळू दिली जाणार आहे. मंजुरीसाठी जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी लातूर यांच्याकडे पाठविण्यात आले असून मंजूर होऊन येताच लाभार्थ्यांना वाळू देण्यात येईल. प्रत्येक लाभार्थ्यांनी पंचायत समितीकडून टोकन दिल्यानंतर स्वतः भाड्याचे वाहन घेऊन ठरवून दिलेल्या ठिकाणाहून वाळू घेऊन जाणार आहेत -चंद्रहार ढोकणे गटविकास अधिकारी पं.स.जळकोट