esakal | कोरोनाचा विळखा: दोन उपअधीक्षक, नऊ अधिकाऱ्यासह ८९ पोलिस झाले बाधित 

बोलून बातमी शोधा

Police Infected Corona

कोरोना विषाणूचा सर्वांत मोठा ताण पोलिस यंत्रणेवर पडत आहे. वर्षभर लातूरकर कोरोनापासून दूर व सुरक्षित राहावेत यासाठी पोलिस रात्रंदिवस काम करीत आहेत.

कोरोनाचा विळखा: दोन उपअधीक्षक, नऊ अधिकाऱ्यासह ८९ पोलिस झाले बाधित 
sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : गेली वर्षभर लातूरकर सुरक्षित राहावे म्हणून रात्रंदिवस रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या पोलिसांना आता कोरोनाचा विळखा बसत आहे. नागरिकांच्या हलगर्जीपणाचा फटका पोलिसांनाही बसू लागला आहे. यातून जिल्ह्यातील दोन पोलिस उपअधीक्षक, नऊ पोलिस अधिकारी, ८९ पोलिस तर वीस होमगार्ड कोरोना बाधित झाले आहेत. यातील काहीजण होम क्वारंटाइन असून, काही जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. लातूरकरांनी हे गांभीर्य आता ओळखण्याची गरज आहे. 

आम्हाला काळजी ठेकेदारांची; रुग्ण तडफडू देत, कोरोना लस संपली अन् रेमडेसिविरचा काळाबाजार

कोरोना विषाणूचा सर्वांत मोठा ताण पोलिस यंत्रणेवर पडत आहे. वर्षभर लातूरकर कोरोनापासून दूर व सुरक्षित राहावेत यासाठी पोलिस रात्रंदिवस काम करीत आहेत. गेल्या लॉकडाउनमध्ये त्यांना सुट्याही मिळाल्या नाहीत. तीन-चार महिन्यांत कोरोनाचा प्रभाव कमी होता. पण, पोलिस मात्र कार्यरत होते. त्यात मार्चापासून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला. गेल्या वर्षीच्या तुलनेत किती तरी पटीने कोरोना रुग्ण समोर येत आहेत. मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन, रात्रीची संचारबंदी सुरू करण्यात आली आहे. लातूरकर पुन्हा सुरक्षित राहावे म्हणून पोलिस रस्त्यावर काम करीत आहेत.

सकाळी सुरू अन् दुपारी बंद! व्यापारी महासंघ म्हणते, आस्थापना सुरु ठेवा 

पण, लातूरकरांच्या हलगर्जीपणाचा फटका या पोलिसांना बसत आहे. गेल्याच आठवड्यात एक पोलिस कोरोनाला बळी पडला. कोरोना असतानासुद्धा रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांमुळे पोलिसांनाही आता कोरोनाचा विळखा बसला आहे. काही दिवसांत जिल्ह्यात दोन पोलिस उपअधीक्षक पॉझिटिव्ह झाले. नऊ अधिकारी तसेच ८९ पोलिस आणि २० होमगार्ड कोरोना बाधित झाले आहेत. यातील ७० पोलिस होम क्वारंटाइनमध्ये असले तरी त्यांच्या कुटुंबियासाठीसुद्धा ही चिंताजनक बाब आहे. इतर अधिकारी व पोलिस वेगवेगळ्या रुग्णालयात आणि कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. लातूरकरांनी आता तरी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. 
 

लातूरकर सुरक्षित राहावेत, म्हणून पोलिस अधिकारी व पोलिस चौका-चौकात उभे राहून रात्रंदिवस काम करीत आहेत. पोलिसही आपलेच बंधू आहेत हे समजून नागरिकांनी वागले पाहिजे. जबाबदारीचे भान नाही तर किमान सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गरज आहे. आपल्यासोबतच पोलिस बांधवही कसे सुरक्षित राहतील यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. 
- निखिल पिंगळे, पोलिस अधीक्षक, लातूर 

Edited - Ganesh Pitekar