Latur News : लोणीचे सरपंच, उपसरपंच अपात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur Loni sarpanch deputy sarpanch disqualified

Latur News : लोणीचे सरपंच, उपसरपंच अपात्र

उदगीर : उदगीर शहरालगत असलेल्या लोणी ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच यांनी कर्तव्यात कसूर करून पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी अप्पर विभागीय आयुक्त अविनाश पाठक यांनी सरपंच व उपसरपंच यांना पदावरून अपात्र करण्यात येत असल्याचा निर्णय दिला आहे.

लोणी (ता.उदगीर ) येथील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते साधुराम जीवन कांबळे यांनी लोणी ग्रामपंचायतचे सरपंच उषा यमुनाजी भुजबळे, उपसरपंच वैजनाथ रामराव बिरादार यांच्या विरुद्ध जिल्हा परिषदेचे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कर्तव्यात कसूर करून पदाचा दुरुपयोग केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अप्पर विभागीय आयुक्त यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९- १ नुसार दाव्याचे अपील अर्ज दाखल केले होते. सदर प्रकरणाची लोणी ग्रामपंचायतचे सरपंच उषा यमुनाजी भुजबळे , उपसरपंच वैजनाथ रामराव बिरादार यांनी गावात असलेली सार्वजनिक विहीर, तलाव यांचा सांभाळ करणे ग्रामपंचायतचे कर्तव्य आहे.

परंतु सरपंच व उपसरपंच यांनी वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता गावातील विहीर बुजवली आहे. तसेच पाण्याचा हौद पाडला. दोन किलोमिटर पांदण रस्त्याच्या मातीकामे न करता बोगस बिले दाखवुन लाखो रुपये उचलुन घेतले. अशी तक्रार तक्रारदाराने दाखल केली आहे. याप्रकरणी उदगीर पंचायत समिती व तहसील कार्यालयाने पंचनामे अप्पर करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवला होता. तर याप्रकरणी अप्पर विभागीय आयुक्त कार्यालयात अपील अर्ज दाखल होते.

अप्पर विभागीय आयुक्त यांच्या निर्णयात सदर प्रकरणात सरपंच आणि उपसरपंच यांनी अनियमितता व पदाचा दुरुपयोग केल्याचे दिसून येते. ग्रामपंचायत अंतर्गत असलेली विहीर नियमानुसार बुजविण्यात आलेली नाही. विहीर बुजविण्यापूर्वी रीतसर परवानगी घेतल्याचे दिसून येत नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील ग्रामसूची ७८ मधील ४६ अन्वय विहीर तलाव यांचा सांभाळ करणे ग्रामपंचायतचे कर्तव्य आहे. मात्र या प्रकरणात ग्रामपंचायतने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

सदर प्रकरणातील सर्व बाबी पाहता सरपंच व उपसरपंच यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचे सिद्ध होते. त्यामुळे कलम ३९ / १ अन्वये लोणी ग्रामपंचायतचे सरपंच उषा यमुनाजी भुजबळे आणि उपसरपंच वैजनाथ रामराव बिरादार यांना सरपंच व उपसरपंच पदावरून अपात्र करण्यात येत आहे असा निर्णय अपर विभागीय अविनाश पाठक यांनी दिला आहे.

Web Title: Latur Loni Sarpanch Deputy Sarpanch Disqualified From Post Upper Divisional Commissioner

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..