हेलिकॉप्टर उचलण्यासाठी 43 फुटी ट्रेलरचा शोध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

लातूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला निलंग्यात गुरुवारी (ता. 25) अपघात झाला होता. हे अपघातग्रस्त हेलिकॉप्टर मुंबईला घेऊन जाण्यासाठी आता 43 फूट लांबीच्या ट्रेलरचा प्रशासनाने शोध सुरू केला आहे. लवकर हे हेलिकॉप्टर घटनास्थळावरून हलविण्यात येणार आहे.

या अपघातात हेलिकॉप्टरचे पंखे तुटून त्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर कंटनेरमध्ये टाकूनच न्यावे लागणार आहे. या हेलिकॉप्टरची लांबी ही 43 फूट आहे. त्यामुळे इतक्‍या मोठ्या लांबीच्या कंटनेरचा शोध घ्यावा, असा आदेश सरकारने दिला आहे. त्यानुसार प्रशासन आता 43 फूट लांबीच्या कंटेनरच्या शोधात आहे. केंद्र सरकारच्या पथकाची पाहणी पूर्ण झाल्यानंतर हे हेलिकॉप्टर घटनास्थळावरून हलविण्यात येणार आहे.

Web Title: latur marathwada news 43 feet trailer searching for helicopter pick up