मराठवाडा, विदर्भातील दुग्धविकासासाठी ६५० कोटी - जानकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

लातूर - राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्डाकडून मराठवाडा व  विदर्भातील दुग्ध उत्पादन वाढीसाठी ६५० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी जोडव्यवसाय म्हणून दुग्धविकास, पशुसंवर्धन व मत्स्यविकास विभागामार्फत ‘मागेल त्याला पोल्ट्री’, ‘मागेल त्याला मासळी’ या योजना राबविल्या जात आहेत. राज्यात ‘मिल्क पार्लर’ ही योजना राबविण्यास सुरवात झाल्यास पहिले मिल्क पार्लर कव्हा गावाला देण्यात येईल, अशी ग्वाही पशुसंवर्धन, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिली. 

स्मार्ट व्हिलेज कव्हा येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन व लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर अध्यक्षस्थानी होते. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते विकास कामांचे उद्‌घाटन झाले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, शैलेश पाटील चाकूरकर, माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, श्रीमती प्रतिभा पाटील कव्हेकर उपस्थित होते.
देवणी येथे देवणी गोवंशसंदर्भात संशोधन व विकास केंद्र उभारण्यासाठी ३४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. राज्यात शासकीय दुग्ध प्रकल्पांचे पुनरुज्जीवन करण्यात येत असून त्याकरिता ‘आरे’ नावाने दुधाचा शासकीय ब्रॅंड तयार करण्याचे नियोजन आहे. राज्यात ‘मिल्क पार्लर’ योजना रबविण्यास सुरवात झाल्यास पहिले मिल्क पार्लर कव्हा गावाला देण्यात येईल, अशी ग्वाही श्री. जानकर यांनी दिली. चांगल्या कार्यासाठी प्रेरणादायी परिणाम करणारा कव्हा स्मार्ट व्हीलेजचा हा विकासकामांचा लोकार्पण सोहळा आहे. राज्यातील जनतेला ग्रामविकासासाठी प्रेरणा देणारे कार्य माजी आमदार कव्हेकर यांनी केले आहे, असे मत श्री. चाकूरकर यांनी व्यक्त केले.  श्री. कव्हेकर यांनी स्मार्ट व्हीलेज संकल्पनेची माहिती देऊन गावांसाठी विविध विकासांत्मक योजनांची मागणी केली. यावेळी श्रीमती कव्हेकर, डॉ. पाटील यांची भाषणे झाली. माजी पशुवैद्यकीय रुग्णालयास आयएसओ प्रमाणपत्र देण्यात आले. कव्हा गाव निर्मलग्राम झाल्याने सरपंच श्रीमती ललीताबाई पाटील यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

कव्ह्यातच विभागीय क्रीडा संकुल
श्री. कव्हेकर यांच्यामुळे हे गाव स्मार्ट व्हीलेज होऊ शकले आहे. अशी गावे ही गावांच्या एकतेतून समन्वयातून, परिश्रमातून निर्माण होतात.  येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या कामातील अडचणी दूर करून पुढील महिन्यात कामाला सुरवात करण्यात येईल. गावात कौशल्य विकासाचे सेंटर देण्यात येईल. कव्हासारखी गावे प्रत्येक तालुक्‍यात निर्माण होण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील, असे श्री. निलंगेकर म्हणाले.

Web Title: latur marathwada news 650 crore for marathwada vidarbha milk development