लातूरचे महापौरपद बीसीसीसाठी आरक्षीत

हरी तुगावकर
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

 राज्यातील 27 महापालिकेच्या महापौरपदाचे आरक्षणाची सोडत बुधवारी (ता. 13) मुंबईत काढण्यात आली आहे. यात लातूर महापालिकेचे महापौरपद हे नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गासाठी (बीसीसी) आरक्षीत झाले आहे. 

लातूर ः राज्यातील 27 महापालिकेच्या महापौरपदाचे आरक्षणाची सोडत बुधवारी (ता. 13) मुंबईत काढण्यात आली आहे. यात लातूर महापालिकेचे महापौरपद हे नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गासाठी (बीसीसी) आरक्षीत झाले आहे.

 

त्यामुळे या प्रवर्गातील नगरसेवकांच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत. सध्या महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. पण राज्यात आता सत्ता बदल होत आहे. त्यामुळे या महापालिकेत देखील आता काँग्रेस फोडाफोडीचे राजकारण करणार का? याकडे आता लक्ष लागले आहे.

लातूर महापालिकेचे महापौर सुरेश पवार यांची मुदत ता. 21 नोव्हेंबर रोजी संपत आहे. राज्यातील लातूरसह 27 महापालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण बुधवारी मुंबईत काढण्यात आले आहे. यात लातूर महापालिकेचे महापौर पदाचे आरक्षण हे बीसीसीसाठी आरक्षीत झाले आहे. सध्या लातूर महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे.

 

त्यांचे 36 नगरसेवक आहेत. तर काँग्रेसचे 33 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा असलेला एक नगरसेवक आता वंचित बहुजन आघाडीत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष व काँग्रेस यांच्यात केवळ तीन नगरसेवकाचा फरक आहे. त्यात राज्यातील सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हातून गेली आहे. काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता आहे.

 

हे लक्षात घेता आता काँग्रेसचे आमदार अमित देशमुख हे येथे फोडाफोडीचे राजकारण करून लातूर महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविणार का? याकडे आता लक्ष लागले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Mayor seat reserved for BCC