लातूरच्या महापौरपदी भाजपचे सुरेश पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

लातूर - महापौर व उपमहापौरांच्या आज झालेल्या निवडणुकीत महापौरपदी सुरेश पवार, तर उपमहापौरपदी देविदास काळे यांची निवड झाली. भाजपने अवघ्या दोन मतांनी कॉंग्रेसवर मात करत विजय मिळविला. भाजपच्या तीन व कॉंग्रेसच्या दोन स्वीकृत सदस्यांसह स्थायी समितीच्या 16 सदस्यांचीही निवड झाली. महापालिकेच्या निवडणुकीत 70 पैकी भाजपला 36, कॉंग्रेसला 33 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक जागा मिळाली होती.
Web Title: latur mayor suresh pawar