esakal | लातूर महापालिकेची मोठी कारवाई; २६ दुकाने केली सील
sakal

बोलून बातमी शोधा

shop sealed

लातूर महापालिकेची मोठी कारवाई; २६ दुकाने केली सील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर: येथील गौसपूरा भागात गोरक्षणच्या जागेवर अनधिकृतपणे पत्र्याचे शेडटाकून दुकाने थाटण्यात आली होती. ही सर्व २६ दुकाने महापालिकेच्या पथकाने बुधवारी (ता. १४) सील करून टाकली आहेत. त्यामुळे दुकाने थाटणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शहरात दुकान बांधत असताना महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक असते. येथील स्क्रॅप मार्केटच्या परिसरात असलेल्या गौसपूरा भागात गोरक्षण संस्थेची जमीन आहे. या जमिनीवर पत्र्याचे शेड टाकून दुकाने उभारण्यात आली आहेत. जणू काय एक व्यापारी संकुलच तयार करण्यात आले आहे. यासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही.

या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने संबंधितांना काही दिवसांपूर्वी नोटीसही देण्यात आली होती. तरिही अतिक्रमण काढण्यात आले नाही. त्यामुळे आयुक्त अमन मित्तल यांच्या आदेशानुसार बुधवारी क्षेत्रिय अधिकारी समाधान सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सदरील जागेवरील २६ दुकाने सील केली आहेत. यात काही मोठ्या व्यापाऱ्यांची देखील दुकाने आहेत. आता कारवाई झाल्याने व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईसाठी श्री. सूर्यवंशी, अतिक्रमण विभाग प्रमुख पी. जे. शेख, अग्निशमन दलाचे महादेव शिंदे, अकबर शेख, तबरेज पठाण आदींनी पुढाकार घेतला होता.

हेही वाचा: अभिनेत्री करीना कपूर विरोधात बीडमध्ये पोलिसांत तक्रार दाखल

गौसपूरा भागात गोरक्षणी संस्थेची जागा आहे. या जागेवर हे दुकाने उभे करण्यात आली होती. नोटीस देवूनही त्याची दखल घेतली गेली नाही. ही सर्व दुकाने अनधिकृतरीत्या उभारली गेली आहेत. त्यामुळे ती सील करण्यात आली आहेत.
-समाधान सूर्यवंशी, क्षेत्रिय अधिकारी, झोन सी.

loading image