दिग्गजांचे काय होणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

लातूर - महापालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. अपेक्षेपेक्षा खूपच कमी मतदान झाले आहे. या निवडणुकीत काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे काही दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात होते. या दिग्गजांचे काय होणार व कमी मतदानाचा फटका कोणाला बसणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या दिग्गजांचे राजकीय भवितव्य आज मशिनबंद झाले आहे.

महापालिकेच्या १८ प्रभागांतील ७० जागांसाठी बुधवारी मतदान झाले आहे. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना बरीच काळजी घेतली होती. उमेदवारी अर्ज भरताना शेवटच्या दिवसापर्यंत आपले पत्ते उघडे केले नव्हते. बंडखोरीच्या भीतीने शेवटच्या दिवशीच उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या गेल्या. यात दिग्गजांना राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली होती. काँग्रेसच्या वतीने महापौर ॲड. दीपक सूळ, माजी महापौर स्मिता खानापुरे, स्थायी समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे, माजी उपमहापौर कैलास कांबळे, रविशंकर जाधव, अशोक गोविंदपूरकर, पप्पू देशमुख, लक्ष्मण कांबळे, गिरीश पाटील, राजकुमार जाधव, भारतीय जनता पक्षाचे देविदास काळे, ॲड. शैलेश गोजमगुंडे, रवी सुडे, अजित पाटील कव्हेकर, शैलेश स्वामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद सावे, राजा मणियार, राजेंद्र इंद्राळे, शिवसेनेचे विष्णू साठे, सुनीता चाळक, रिपाइंचे चंद्रकांत चिकटे आदींचा समावेश आहे. या दिग्गजांच्या प्रभागातही फारसे समाधानकारक मतदान झालेले नाही. त्यामुळे या कमी मतदानाचा फटका कोणत्या दिग्गजांना बसणार याकडे आता लक्ष लागले आहे. 

Web Title: latur municipal election