सत्तेचा कौल कुणाला? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

लातूर - महापालिकेच्या ७० जागांसाठी बुधवारी (ता. १९) ५७.९० टक्के मतदान झाले. याची मतमोजणी शुक्रवारी (ता. २१) सकाळी दहा वाजता बार्शी रोडवरील महिला तंत्रनिकेतन येथे सुरू होणार आहे. शहरातील मतदारांचा सत्तेचा कौल भाजपला मिळणार, की काँग्रेसला? हा कळीचा मुद्दा आहे.

लातूर - महापालिकेच्या ७० जागांसाठी बुधवारी (ता. १९) ५७.९० टक्के मतदान झाले. याची मतमोजणी शुक्रवारी (ता. २१) सकाळी दहा वाजता बार्शी रोडवरील महिला तंत्रनिकेतन येथे सुरू होणार आहे. शहरातील मतदारांचा सत्तेचा कौल भाजपला मिळणार, की काँग्रेसला? हा कळीचा मुद्दा आहे.

पालिकेच्या ७० सदस्यांच्या निवडीसाठी १८ प्रभागांतून ४०१ उमेदवारांत लढत झाली. आरक्षण धोरणानुसार अ, ब, क व ड गटातून उमेदवारांनी अर्ज भरले होते. पालिकेच्या क्षेत्रात दोन लाख ७७ हजार ७७५ मतदार आहेत. त्यात एक लाख ४६ हजार २४५ पुरुष तर, एक लाख ३१ हजार ५३० स्त्री मतदारांचा समावेश आहे. त्यापैकी ८५ हजार ९९७ पुरुष मतदारांनी, तर ७४ हजार ८६१ स्त्री मतदारांनी म्हणजेच एकूण एक लाख ६० हजार ८५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरी ५७.९० टक्के मतदान झाले. ३७१ बुथवरील मतदानानंतर सर्व मतदानयंत्रे शासकीय महिला तंत्रनिकेतनमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली. त्याची मतमोजणी शुक्रवारी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली सहा कक्षात मतमोजणीची बुथनिहाय मतमोजणी होईल.  एका प्रभागासाठी दोन याप्रमाणे १८ प्रभागांसाठी ३६ टेबलवर एचाच वेळी सर्व प्रभागांची मतमोजणी होईल. प्रभागातील बुथच्या संख्येनुसार तीन ते पाच फेऱ्या होतील व फेरीनिहाय मते जाहीर होतील. अंतिम मोजणीनंतर राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार विजयी उमेदवार घोषित केले जातील. दुपारी एकपर्यंत सर्व प्रभागांचे निकाल घोषित होण्याची अपेक्षा आहे.  

महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसविरुद्ध भाजपने रान उठविले. केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, तसेच राज्यातील नेत्यांच्या सभांमुळे वातावरण तापले. राज्यात व केंद्रातील सरकारचा प्रभाव व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाचा भाजपला फायदा झाला. त्यामुळे शून्यावरील भाजपला थेट सत्तेची स्वप्ने दिसू लागली आहेत. काँग्रेसनेही सत्ता कायम ठेवण्यासाठी मोठी धडपड केली. आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुनियोजित कॅम्पेन करण्यात आले. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह माजी केंद्रीय मंत्री, माजी मंत्री व अन्य नेत्यांच्या सभा झाल्या. मतदारांनी मतदान करून त्यांचा कौल निश्‍चित केला; मात्र तो भाजपला मिळणार की काँग्रेसला? याचे उत्तर शुक्रवारच्या मतमोजणीत कळणार आहे.

Web Title: latur municipal election