

Highway Insecurity: The Midnight Robbery Incident at Gharani
Sakal
चाकूर : लातूर - नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील घरणी गावाजवळ २० ते २५ वर्षे वयातील चार अज्ञात दरोडेखोरांनी दोन कार अडवून प्रवाशांना मारहाण करीत महिला जवळील सुमारे ३ लाख ४७ हजार २५० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता.२०) पहाटे साडे चार वाजता घडली आहे, या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे, घरणी येथील महामार्ग पोलिस ठाण्याच्या अतिशय जवळ ही घटना घडली असल्यामुळे रात्रीच्या वेळी महामार्ग पोलिसांच्या गस्तबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.