दरवर्षी होणार अडीचशे बोगींची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

लातूर - भारतीय रेल्वेतर्फे येथे सुरू करण्यात येणाऱ्या रेल्वे बोगी कारखान्यात पहिल्या टप्प्यात पाचशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कारखान्यातून दरवर्षी अडीचशे बोगी तयार केल्या जाणार आहेत, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. या रेल्वे बोगी कारखान्याचे भूमिपूजन शनिवारी (ता. 31) सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. रेल्वे बोगी कारखाना स्थापन करण्याचा निर्णय जानेवारीमध्ये घेण्यात आला होता. या कारखान्यातून पहिल्या टप्प्यात दरवर्षी 250, तर दुसऱ्या टप्प्यात 400 बोगी तयार केल्या जाणार आहेत.
Web Title: latur news 250 railway bougue generation