प्रजासत्ताक दिनी कोपीतच चिमुकलीचा थंडीमुळे मृत्यू

सुधाकर दहिफळे
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

रेणापूर, (जि. लातूर) : यवतमाळ जिल्ह्यातील ऊसतोड मजुराच्या तीन महिन्याच्या  मुलीचा प्रजासत्ताक दिनीच थंडीमुळे कोपीतच मृत्यू झाल्याची घटना आज (शुक्रवार) पहाटे चार वाजता खलंग्री (ता. रेणापूर) येथे घडली.

रेणापूर, (जि. लातूर) : यवतमाळ जिल्ह्यातील ऊसतोड मजुराच्या तीन महिन्याच्या  मुलीचा प्रजासत्ताक दिनीच थंडीमुळे कोपीतच मृत्यू झाल्याची घटना आज (शुक्रवार) पहाटे चार वाजता खलंग्री (ता. रेणापूर) येथे घडली.

बाळू श्रीरंग नामनोर (वय ३२ वर्षे रा. आमटी ता. पुसद, जिल्हा यवतमाळ) ऊसतोडीसाठी या भागात आले आहेत, त्यांनी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर या खाजगी साखर कारखान्याशी ऊसतोडीचा करार केला आहे. सध्या ते खलंग्री (ता. रेणापूर) या गावात नऊ दिवसापासून ऊसतोड करत आहेत. त्यांना तीन अपत्ये होती पहिला मुलगा सुरज (वय चार वर्षे) तर दुसरा दिपक (वय दोन वर्षे) व तिसरी तीन महिन्याची नयना असे अपत्ये. यातील नयना या तीन महिन्याच्या चिमुकलीचा थंडीमुळे प्रजासत्ताक दिनीच कोपीतच मृत्यू झाला. ही बाब गंगाखेड शुगरच्या प्रशासनाला कळविण्यात आल्यानंतर त्यांनी गावाकडे जाण्याची सोय केली असून, आम्ही त्या वाहनाच्या प्रतिक्षेत असल्याचे मयत चिमुकलीचे वडील बाळू नामनोर यांनी सांगितले.

Web Title: latur news death of the girl due to cold on the republic day