'कोरेगाव भीमा घटनेतील संशयित सरकारमुळेच बाहेर '

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

लातूर- ""कोरेगाव भीमा येथील दंगलीची माहिती राज्य सरकारकडे होते. वेळीच दखल घेतली असती तर दंगल घडली नसती. राज्य सरकारचा पाठिंबा असल्यानेच या दंगलीचे संशयित आज बाहेर आहेत,'' असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. सोमवारी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

मुंडे म्हणाले, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सोशल इंजिनिअरिंग हे बूमरॅंग आहे, अशा पोस्ट आता फिरू लागल्या आहेत. ही दंगल अचानक झालेली नाही. दंगलीपूर्वी ज्या संघटना माथी भडकविण्याचे काम करत होत्या, त्याची माहिती सरकारकडे होती. त्याची चौकशी करण्याची गरज आहे. 

दरम्यान, केंद्र व राज्य सरकारविषयी सामान्यांत असंतोष पसरला आहे. हाच असंतोष व्यक्त करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने हल्लाबोल यात्रा काढली जाणार आहे, अशी माहिती देत तुळजापूरहून 16 जानेवारीला या हल्लाबोल यात्रेला सुरवात होणार आहे. मराठवाड्यात नऊ दिवस ही यात्रा चालेल, असे मुंडे यांनी सांगितले. 

अन्‌ आताचा भाजप वेगळा 
मी कधीही संघ शाखेवर गेलो नाही. दिवंगत प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे असताना मी भाजपमध्ये होतो. त्या वेळेसचा भाजप व आताचा यात जमीन-अस्मानाचा फरक झाला आहे. सध्या भाजपमधील नवीन पर्व देशाला परवडणारे नाही, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

Web Title: latur news dhananjay munde koregaon bhima riot