वापरलेल्या विजेचा हिशेबच नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

लातूर - महावितरणच्या लातूर परिमंडलात मागील वर्षभरात वापरलेल्या तब्बल साडेआठशे दशलक्ष युनिट विजेचे मोजमापच झालेले नाही. या युनिटचे बिलिंग तब्बल पाचशे कोटींच्याही पुढे जात आहे. या स्थितीत वापरलेली ही वीज नेमकी गेली कुठे? असा प्रश्न महावितरणचे कार्यकारी संचालक श्रीकांत जलतारे यांना पडला. या विषयावरून त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

या बैठकीमुळे महावितरणच्या परिमंडलातील वातावरण चांगलेच तापले आहे. थकीत व चालू वीजबिलाच्या वसुलीचा पाठपुरावा करण्यासाठी जलतारे दौऱ्यावर आले होते. त्यांनी लातूर परिमंडलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

Web Title: latur news electricity calculation