लातूरचा अडत बाजार सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

लातूर - लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात येणारा नॉन एफएक्‍यू दर्जाचा शेतमाल खरेदी-विक्रीस जिल्हा उपनिबंधकांनी परवानगी दिल्यानंतर बुधवारी (ता. एक) येथील अडत बाजार सुरू झाला. शासनाच्या त्रिस्तरीय समितीने बाजारात फिरून काही नमुन्यांची तपासणी करून नॉन एफएक्‍यू दर्जाचा माल खरेदी-विक्रीस परवानगी दिल्यानंतर व्यवहार सुरू झाले. गेल्या तीन दिवसांपासून हा बाजार बंद होता. आज सुरू होताच लाखो क्विंटलचा शेतमाल विक्रीला गेला; पण हमीभावापेक्षा कमी भावानेच हा शेतमाल विकला गेला आहे.

सोयाबीन, मूग, उडीद हा शेतमाल हमीभावानेच खरेदी करावा, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार बाजार समितीनेही व्यापाऱ्यांना सूचना दिल्या होत्या; पण व्यापाऱ्यांनी खरेदी करणेच बंद केले होते. सध्या सोयाबीनची तीस ते चाळीस हजार क्विंटलची आवक आहे. परतीच्या पावसाने या सोयाबीनमध्ये ओलावा मोठा आहे. त्यामुळे व्यापारी हा माल हमीभावाप्रमाणे खरेदी करीत नाहीत; तसेच हा माल शासनही खरेदी करीत नाही. त्यामुळे नॉन एफएक्‍यूचा माल खरेदी करण्यास परवानगी द्यावी; तसेच यासंबंधी मार्गदर्शन करावे, असे पत्र बाजार समितीने जिल्हा उपनिबंधकांना लिहिले होते. यात मंगळवारी (ता. ३१) जिल्हा उपनिबंधकांनी नॉन एफएक्‍यूचा  शेतमाल खरेदी-विक्रीस परवानगी दिली. त्यानुसार बुधवारी हा बाजार सुरू झाला आहे.

बुधवारी सकाळी बाजार समितीच्या वतीने सौद्यासाठी झेंडा फिरविण्यात आला. या वेळी बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर, तालुका कृषी अधिकारी वीर, सहायक निबंधक ए. एस. कदम या शासनाच्या त्रिस्तरीय समिती उपस्थितीत होती. या समितीने बाजारात काही ठिकाणी जाऊन शेतमालाची पाहणी केली. त्याचा दर्जा पाहिला. त्यानंतर खरेदी-विक्री करण्यास परवानगी दिली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून बाजारात पडून असलेल्या लाखो क्विंटल शेतमालाची खरेदी-विक्री झाली आहे; पण हमीभावापेक्षा कमी भावानेच हा माल विकला गेला आहे.

बाजार समितीच्या वतीने गेल्यावर्षी शेतमाल तारण योजना सुरू केली होती. यात शेतकऱ्यांनी २२ हजार ५०० क्विंटल सोयाबीन ठेवले होते. यात बाजार समितीने चार कोटी रुपयांचे पेमेंटही केले होते. राज्यात ही बाजार समिती दुसरी होती. यावर्षीही सोयाबीनची आवक मोठी राहणार आहे. त्यामुळे लवकरच शेतमाल तारण योजना सुरू करण्यात येणार आहे. 
मधुकर गुंजकर, सचिव, बाजार समिती.

Web Title: latur news krushi utpanna samiti