महापालिका कर्मचाऱ्यांचा यंदा दसरा होणार गोड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

लातूर - येथील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दोन-तीन महिन्यांपासून पगार मिळत नाही. त्यात दसरा पाच दिवसांवर आला आहे. हा सण कसा साजरा करायचा हा प्रश्‍न कर्मचाऱ्यांसमोर आहे. त्यामुळे त्यांनी सोमवारी (ता. २५) महापालिकेतच धरणे आंदोलन केले. या आंदोलनाची दखल महापौरांना तातडीने घ्यावी लागली. त्यांनी या आंदोलनाला भेट देत या कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांचा पगार व दहा हजार रुपये फेस्टिव्हल लोन असा एकूण साडेपाच कोटी रुपये मंगळवारी (ता. २६) कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील, अशी ग्वाही दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. 

महापालिकेत कार्यालयीन कर्मचाऱ्यांची संख्या २५० आहे. सफाई कामगार ६५० आहेत. तर सोसायटीवर ८३ कर्मचारी कामाला आहेत. यात कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांपासून, तर सफाई कामगारांचा दोन महिन्यांपासून पगारच झालेला नाही. त्यात येत्या शनिवारी दसरा आहे. हा एक महत्त्वाचा सण आहे. हा सण कसा साजरा करायचा हा प्रश्‍न कर्मचाऱ्यांसमोर होता. मागणी करूनही त्यांना पगार मिळत नव्हता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी महापालिकेतच धरणे आंदोलन सुरू केले. दोन तास आंदोलन केल्यानंतर महापौर सुरेश पवार यांनी या आंदोलनाला भेट दिली. या वेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पगार मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा  कर्मचाऱ्यांनी घेतला. त्यानंतर श्री. पवार यांनी सर्व कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांचा पगार मंगळवारी केला जाईल; तसेच दहा हजार रुपये फेस्टिव्हल लोन देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी आपले धरणे आंदोलन मागे घेतले.

Web Title: latur news latur municipal corporation

टॅग्स