प्लॅस्टिकमधील पुष्पगुच्छ अधिकाऱ्यांना महागात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

लातूर - शासकीय बैठकीत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे स्वागत करताना प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेले पुष्पगुच्छ (बुके) दिल्याबद्दल येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) अधिकाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला. प्लॅस्टिकबंदीनंतर एखाद्या शासकीय यंत्रणेला दंड आकारण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असावी.

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक आज येथे झाली. त्या वेळी हा प्रकार घडला. राज्यात शनिवारपासून प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. 

सत्कार समारंभ सुरू असताना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत प्लॅस्टिककडे लक्ष गेले. त्यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये दंड करण्याचे आदेश दिले.
 
Web Title: latur news lower bouquets in plastic

टॅग्स