लातूर: मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

नवीन पुलाच्या कामाला दहा महिन्यांनंतर ऐन पावसाळ्यात सुरवात करण्यात आली होती. पण आजच्या आवकाळी मुसळधार पावसाने पर्यायी पूल वाहून गेल्याने या मार्गावरील अनेक गावांचा संपर्क तूटला आहे.

लातूर - जानवळ येथे पहाटेपासून मुसळधार पाऊस पडल्याने नद्या नाल्यांना पुर येऊन प्रचंड नुकसान झाले आहे.

लातूर-अहमदपूर मार्गे जानवळ रोडवरील पर्यायी पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जानवळपासून तीन किमी अंतरावर असलेल्या या पुलाचा कांही भाग गेल्यावर्षीच्या अतिवृष्टीने ढासळल्याने तो बंद करून सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यायी पूल बनवला होता, तोही गेल्यावर्षी तीन वेळेस वाहून गेला होता.

नवीन पुलाच्या कामाला दहा महिन्यांनंतर ऐन पावसाळ्यात सुरवात करण्यात आली होती. पण आजच्या आवकाळी मुसळधार पावसाने पर्यायी पूल वाहून गेल्याने या मार्गावरील अनेक गावांचा संपर्क तूटला आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
अकोला, बुलडाणा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
'सीएम'साहेब! जाळपोळ करणारे शिवसेनेवाले समजायचे का?​
नागालँड: चकमकीत जवान हुतात्मा, 3 दहशतवादी ठार​
लंडनवासीयांनी लुटला सांस्कृतिक कार्यक्रमांचा 'आस्वाद'​
बसोलीच्या कलावंतांनी साकारले अनोखे भित्तिचित्र​
कोहली फाउंडेशनच्या कार्यक्रमात मल्ल्या ‘बिन बुलाए मेहमान’​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latur news marathwada news rain in latur