वैद्यकीय महाविद्यालयात ५६ सुरक्षारक्षक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

लातूर - राज्यात तीन महिन्यांपूर्वी डॉक्‍टरांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शासकीय रुग्णालयातील डॉक्‍टरांनी संप केला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याच्या रुग्णालयात सुरक्षारक्षक द्यावेत, अशी त्यांची प्रमुख मागणी होती. शासनाने ती मागणी आता पूर्ण केली आहे. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ५६ सुरक्षा रक्षक देण्यात आले असून, ते तैनातही करण्यात आले आहेत. 

राज्यात तीन महिन्यांपूर्वी अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्‍टरांवर हल्ले झाले होते. त्यानंतर डॉक्‍टरांनी संप पुकारला होता. चार-पाच दिवस राज्यातील डॉक्‍टर संपावर गेल्याने रुग्णसेवा विस्कळित झाली होती. यात शासनाने लवकरच सुरक्षारक्षक दिले जातील अशी ग्वाही या डॉक्‍टरांच्या संघटनेला दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला होता. 

शासनाने याकरिता महाराष्ट्र सिक्‍युरिटी सर्व्हीस कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सुरक्षारक्षक देणे सुरू केले आहे. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी डॉक्‍टर्स डेनिमित्त ५६ सुरक्षारक्षक देण्यात आले आहेत. यात दोन सुरक्षारक्षक शस्त्रधारी असणार आहेत. आणखी दोन शस्त्रधारी सुरक्षारक्षक येणार आहेत. यात एक प्रमुख नियंत्रक, चार सुपरवायझर, तर ५१ जवान असणार आहेत. महाविद्यालय व रुग्णालयातील संवदेशनील ठिकाणी त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यात अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, लहान मुलांचा अतिदक्षता विभाग, जळीत रुग्ण विभाग, प्रसूती विभाग, नेत्रविभाग अशा ठिकाणी हे जैवान तैनात करण्यात आले आहेत. वसतिगृहासाठीही जवान देण्यात आले आहेत.

शनिवारी (ता. एक) जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी महाविद्यालयाला भेट दिली. या सुरक्षारक्षकांची पाहणीही त्यांनी केली. या वेळी अधिष्ठाता डॉ. श्रीकांत गोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलेंद्र चव्हाण, ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. सागर गवळी उपस्थित होते. 

Web Title: latur news medical college Security guard