२०२२ हे घटना बदलाचे वर्ष - ॲड. आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

लातूर - मोदी सरकार आरक्षणविरोधी; तसेच घटनेच्या विरोधात काम करणारे सरकार आहे. त्यांना घटनेत बदल करायचा आहे; पण राज्यसभेत बहुमत नाही. २०२२ मध्ये त्यांना राज्यसभेत बहुमत मिळण्याची शक्‍यता आहे, असे झाल्यास घटनेत बदल करण्याचा त्यांचा डाव आहे, अशी भीती भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. सोमवारी (ता. २८) लातूरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्षाच्या वतीने आयोजित बहुजन हक्क परिषदेसाठी ते शहरात होते. 

भाजप व संघाचा स्वतःचा वेगळा अजेंडा आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने ओळखले आहे. त्यामुळे विविध प्रकरणांत न्यायालयाने पंतप्रधानांवर ताशेरे ओढले. पक्षाचे नव्हे, तर देशाचे पंतप्रधान आहात अशी आठवण करून दिली, त्यामुळे त्यांनी या खुर्चीवर राहावे, की नाही ते त्यांनीच ठरवावे, असे ॲड. आंबेडकर म्हणाले.  राज्य सरकारही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहे. कर्जमाफीचा केवळ दिखावा केला गेला आहे, असे ते म्हणाले. 

‘त्यांना’ कुबड्याच घ्याव्या लागतात
माजी मुख्यमंत्री नारायण राणे व राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल ते म्हणाले, की स्वतःच्या पायावर उभे राहण्याची त्यांची क्षमता नाही. त्यांना कुबड्याच घ्याव्या लागतात. एका मतदारसंघापुरते ते मर्यादित आहेत. राज्यात त्याचा फारसा फरक पडणार नाही.

Web Title: latur news prakash ambedkar