लातूर : रेंगाळलेल्या पासपोर्ट कार्यालयाला मिळणार गती

Latur passport office issue will be sort soon
Latur passport office issue will be sort soon

लातूर : लातूरमधील पासपोर्ट सेवा केंद्र गेल्या सात महिन्यांपासून रेंगाळले आहे. नूतनीकरण करून ठेवलेले कार्यालय धुळ खात पडून आहे. त्यामुळे लातूरकरांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर, लातूरमधील पासपोर्ट सेवा केंद्र ऑक्टोबर महिन्यातच सुरू होईल, अशी माहिती भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी ‘सकाळ’ला दिली.

लातूरात पासपोर्ट सेवा केंद्र केव्हा सुरू होणार? याबाबत लातूरपासून पुण्यापर्यंतच्या पासपोर्ट कार्यालयात वारंवार चकरा मारूनही लातूरकरांना आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते. म्हणून ‘सकाळ’ने थेट डॉ. मुळे यांच्याशी संपर्क केला. तेव्हा त्यांनी याच महिन्यात हे कार्यालय सुरू होईल, अशी माहिती दिली. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी पुण्यातील पासपोर्ट कार्यालयाला भेट दिली होती. तेंव्हाही लातूरमधील कार्यालय लवकर सुरू करा, अशा सूचना येथील अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. त्यामुळे लातूरमधील पासपोर्ट सेवा केंद्राला आता गती मिळणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे. लातूरमध्ये मार्च महिन्यात हे कार्यालय सुरू होणार होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com