
शेजारील कर्नाटक राज्यातून इनोव्हा कारमधून रविवारी (ता.२२) रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास विक्रीसाठी नेण्यात येणारा गुटखा उदगीर ग्रामीण पोलीसांनी वळण रस्त्यावर सापळा रचुन पकडला आहे एका आरोपीसह अठरा लाख ६६ हजार रुपयाचा ऐवज पोलीसांनी जप्त केला आहे.
याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की रविवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास शेजारील कर्नाटक राज्यातून त्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली