' काँग्रेस जळकोट नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढणार '

शिवशंकर काळे
Saturday, 23 January 2021

जळकोट येथे नगरपंचायतीच्या निवडणूक संदर्भात संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते

जळकोट (जि.लातूर): येथील नगरपंचायतीचा कार्यकाल संपला असून काही दिवसात निवडणुका लागणार आहेत. नगरपंचायत निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आदेश प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक जितेंद्र दहाडे यांनी शनिवारी सांगितले.

जळकोट येथे नगरपंचायतीच्या निवडणूक संदर्भात संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दहाडे बोलत होते. पुढे बोलताना श्री. दहाडे यांनी गेल्या वेळेस आपण नगरपंचायत निवडणुकीत अंत्यत कमी जागा मिळाल्या होत्या. ज्यांना पाच वर्ष सत्ता दिली त्यांनी पाच वर्षांत शहराच्या विकासासाठी  काय काम केले हे मतदरांना पटवून सांगा. प्रत्येक वार्डात बैठका घ्या, तिथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घ्या. प्रत्येकाला नगरसेवक होण्याची ईच्छा असते पंरतू जागा सतरा आहेत. प्रत्येकाला तिकीट देणे शक्य होणार नाही. ज्यांना पक्षाने तिकीट दिले आहे.नत्या उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडणून आणले पाहिजे.

Gram Panchayat Election: उदगीर तालुक्यात सरपंचपदाची सोडत लवकरच | eSakal

प्रदेश काँग्रेसचे निरिक्षक जितेंद्र देहाडे  यांच्या हस्ते लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा पक्ष निरीक्षक पृथ्वीराज शिरसाठ, समन्वयक प्रमोद जाधव काँग्रेस मिडियाचे जिल्हाध्यक्ष हरिरराम कुलकर्णी, जळकोट तालुका अध्यक्ष मन्मथ किडे, मारोती पांडे,डाॅ.चंद्रकांत काळे,महेश धुळशेट्टे,गणपत धुळशेट्टे, दत्ता पवार, आदीसह काॅग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur political news Congress to contest Jalkot Nagar Panchayat elections on its own