
उदगीर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायती पैकी ६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे
उदगीर (लातूर): तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी (ता.२९) रोजी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या हस्ते काढण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता उदगीर तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतीची सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. संबंधित गावच्या प्रतिनिधी समोर या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.
उदगीर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायती पैकी ६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तालुक्यातील मुदत संपलेल्या ६१ ग्रामपंचायती अंतर्गत प्रभाग रचना, प्रभाग निहाय आरक्षण, मतदार याद्यांचे काम टाळेबंदीच्या अगोदरच पूर्ण झाले असून टाळेबंदी मुळे ही प्रक्रिया स्थगित झाली होती. मात्र आता निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करून निवडणुकीपूर्वी आरक्षणाची सोडत काढली होती मात्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ही सोडत रद्द केली होती.
संदीप क्षीरसागरांची आघाडी बीड नगरपालिकेत घायाळ झाली का? काकांच्या गटाकडे सर्व समित्या |
लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी शुक्रवारी (ता.२२) रोजी आदेश काढून उदगीर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी (ता.२९) काढण्याचे निर्देशित केले आहे. उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली व उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित गावचे लोकप्रतिनिधींनी समोर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
शेतात पाच मोरांचा मृत्यू, बीडमधील लोणी शिवारात खळबळ
गावपातळीवर निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतीचे अनेक ग्रामस्थ या सरपंच पदाच्या आरक्षणाच्या सोडतीकडे लक्ष ठेवून होते. उदगीर तालुक्यातील आरक्षणाची सोडत कधी होईल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या ग्रामस्थांची प्रतीक्षा आता संपली असून दिवाळीनंतर लागलीच ही सोडत पूर्ण होणार आहे.
(edited by- pramod sarawale)