esakal | लातूर : विजेचा शॉक लागून खाजगी लाईन मॅनचा मृत्यू । Death
sakal

बोलून बातमी शोधा

लातूर : विजेचा शॉक लागून खाजगी लाईन मॅनचा मृत्यू

लातूर : विजेचा शॉक लागून खाजगी लाईन मॅनचा मृत्यू

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (जि. लातूर) : तालुक्यातील नळगीर परिसरात येथे रविवारी (ता.३) ३ ते ४ वाजेच्या सुमारास प्रशांत दिगांबर पोतदार यांच्या शेतात अविनाश शेरे हे विद्युत खांबावर काम करत असताना शॉक लागुन मरण पावले. यास कारणीभूत असणाऱ्या अभियंत्यासह तिच्यावर वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: तब्बल दीड वर्षानंतर वाजली शाळेची 'घंटा'

याबाबत वाढवणा पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शामसुंदर लक्ष्मण जाधव , गुत्तेदार पंकज चांदूरे व कनिष्ठ अभियंता रोहीत तरटे या तिघांच्या सांगण्यावरून अविनाश माधवराव शेरे यांना नळगीर परिसरातील साईटच्या विद्युत पोलवर चढून काम करन्यास भाग पाडले असताना शॉक लागून, मरण पावले आहे.

गुत्तेदार व इंजिनीअर यांनी विद्युत तारेतील विद्युत प्रवाह सुरू आहे किंवा बंद याची खात्री न करता अविनाश यांना पोलवर चढून काम करण्यास भाग पाडले अशी फिर्याद मयताचा भाऊ संतोष माधवराव शेरे यांनी वाढवणा पोलीस ठाण्यात दिल्या वरून शामसुंदर जाधव, पंकज चांदूरे, रोहीत तरटे या तिघाविरूद्ध वाढवणा पोलीस स्टेशन येथे सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जोंधळे अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top