लातूर : २०२४ मध्येही मोदी सरकारच; रामदास आठवले

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा विश्वास
Latur Ramdas Athawale says Modi government in 2024
Latur Ramdas Athawale says Modi government in 2024sakal

अंबाजोगाई : विविध विकासकामांच्या पाठबळावर देशात २०२४ मध्येही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार असेल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केला.

येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेतील प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांच्या निवृत्तीनिमित्त सत्कार सोहळ्यास आठवले बुधवारी येथे आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या राज्यसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे. महाविकास आघाडी सरकारने कितीही प्रयत्न केले, तरी सहाव्या जागेसाठी आमचे धनंजय महाडिकच निवडून येतील. शिवसेनेने तेथे उमेदवार दिल्याने भाजपला उमेदवार द्यावा लागल्याचे ते म्हणाले.

मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गत आठ वर्षांत महामार्गांसह वेगवेगळ्या क्षेत्रात विकास घडवून आणला. विविध योजना आखल्या व त्यांची यशस्वी अंमलबजावणी केली. देशात प्रगती घडवून आणली. कित्येक वर्षे सत्तेत असूनही काँग्रेसला असा विकास घडवता आला नाही. विकास, प्रगतीच्या बळावर २०२४ च्या पंचवार्षिक निवडणुकीतही मोदींचेच नेतृत्व असेल. रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. ममता बॅनर्जींसह देशात सर्व विरोधक एकत्र आले, तरी त्यांना मोदींशी सामना करणे अशक्य असल्याचे आठवले म्हणाले.

‘आरपीआय’ला राज्यसभेची एखादी जागा मिळायला पाहिजे होती, अशी खंत व्यक्त करीत आठवले यांनी राज्यातील स्थानिक निवडणुकांत आमची भाजपशी युती असेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी तशी चर्चा झाली असून ‘आरपीआय’ युतीत प्रत्येक ठिकाणी पाच जागा घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई महापालिकेत शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अंबाजोगाई ते घाटनांदूर या नव्या रेल्वेमार्गासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करू. अंबाजोगाईत मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे, त्यासाठी केंद्र सरकारकडून लागणारी मदत उपलब्ध करून देऊ.

-रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com