हम लेके रहेंगे... आझादी, नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध

Protest March Against Citizenship Amendment Act In Latur
Protest March Against Citizenship Amendment Act In Latur

लातूर : हम लेके रहेंगे... आझादी, अरे हम क्‍या चाहते... आझादी अशा घोषणा देत नागरिकांनी शहरात बुधवारी (ता.22) तिरंगा फेरी काढली. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक बांधव या फेरीत सहभागी झाले होते. नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी इन्कलाब कृती समितीच्या वतीने तिरंगा फेरी काढण्यात आली.

गंजगोलाई ते ईदगाह मैदान या मार्गावर काढण्यात आलेल्या या फेरीत शेकडो बांधव सहभागी झाले होते. फेरीची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, भगतसिंग यांच्या छायाचित्रांबरोबरच हातात तिरंगा घेऊन महिलांनी भारतमाता की जय, इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणांनी केली. त्यापाठोपाठ शालेय विद्यार्थी एपीजे अब्दुल कलाम यांचे छायाचित्र घेऊन फेरीत सहभागी झाले.


तानाशाही नही चलेंगी, हिटलरशाही नही चलेंगी... अशा घोषणा देत फेरी शहरातील मुख्य रस्त्यावरून मार्गस्थ झाली. बहुतांश नागरिकांच्या हातात यावेळी वेगवेगळ्या घोषणांचे फलक होते. तर काहींच्या हातात तिरंगा होता. आम्ही भारताचे नागरिक, आमचा एकच धर्म माणुसकी अशी वाक्‍ये फलकांवर लिहिली गेली होती. फेरीदरम्यान शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही वेळासाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे पर्यायी रस्त्यावर वाहतूक सुरू होती. मात्र या मार्गावर वाहतूक रेंगाळल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com