

Latur student dies after being attacked during college freshers party police investigation begins
Esakal
कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टीत धक्का लागल्यावरून वाद झाला आणि या वादातून एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. लातुरमध्ये महाविद्यालयात हा मारहाणीचा प्रकार घडला होता. फ्रेशर्स पार्टीवेळी नाचत असताना सूरज शिंदे या विद्यार्थ्याचा एका विद्यार्थ्याला धक्का लागला होता.