
लातूर : लातूर ते मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू करावी, अशी मागणी लातूरकरांची असली तरी पुढील काही महिने तरी या रेल्वेची शक्यता धूसर दिसत आहे. या रेल्वेसाठी व्यवहार्यतेची (फिजिबिलिटी) तपासणी झालेली नाही. या मार्गावर क्रॉसिंगची कमतरता आहे. इतकेच नव्हे, तर वंदे भारत रेल्वेच्या स्पीडसाठी लागणारा ट्रॅकच नाही. त्यामुळे वंदे भारत रेल्वेसाठी पुढील काही महिने किंवा वर्षभर लातूरकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.