लातूर - उस्मानाबाद - बीड; 29 केंद्रावर पार पडली मतदान प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

बीड : लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 21) झालेल्या मतदानात तीन जिल्ह्यांपैकी 1005 पैकी 1004 मतदान झाले. बीड जिल्ह्यातील माजलगाव केंद्रावरील केवळ एक मतदान झाले नाही. 

लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपकडून माजी मंत्री सुरेश धस तर राष्ट्रवादी काँग्रेसने अशोक जगदाळे यांना पुरस्कृत केले होते. दोन्ही पक्षांकडून निवडणुक प्रतिष्ठेची केल्याने मतदानाच्या आकडेवरीवरुन दिसते. सोमवारी सकाळी आठ वाजता सुरु झालेली मतदान प्रक्रीया चार वाजता संपली. या निवडणुकीसाठी तीन जिल्ह्यांत तालुकानिहाय 29 मतदान केंद्र होते.

बीड जिल्ह्यात बीड तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय तर गेवराईत नगर परिषद कार्यालयात मतदान केंद्र होते. उर्वरित ठिकाणी तहसिल कार्यालयात मतदान प्रक्रीया पार पडली. यामध्ये लातूर जिल्ह्यातील 353 पैकी 353, उस्मानाबाद जिल्ह्यात 291 पैकी 291 तर बीड जिल्ह्यात 361 पैकी 360 मतदानाची नोंद झाली. एकूण 1005 पैकी 1004 मतदान झाले. प्रत्येक मतदान केंद्रावर एका तहसिलदार केंद्राध्यक्षासह पाच मतदान अधिकारी होते. तर, मतदारांची ओळख पटविण्यासाठी स्थानिक संस्थेतील दोन कर्मचाऱ्यांची प्रत्येक केंद्रावर नेमणूक होती. या प्रक्रीयेसाठी 14 झोनल अधिकाऱ्यांनी नेमणूक करण्यात आली होती. 

फरार नगरसेवकाचे मतदान हुकले
दरम्यान, बीड जिल्ह्यात 361 पैकी 360 मतदानाची नोंद झाली असून माजलगाव केंद्रावरील 35 पैकी 34 मतदारांनी आपला हक्क बजावला. येथील राष्ट्रवादीचा नगरसेवक आणि पालिकेतील गठनेता विजय उर्फ भारत अलझेंडे याच्यावर पतसंस्थेच्या माध्यमातून ठेवीदारांची फसवूक केल्याचे गुन्हे नोंद असल्याने तो फरार आहे. त्यामुळे त्याचे मतदान झाले नाही. 

Web Title: latur usmanabad beed local bodies election on 29 centers