विधानसभा निवडणुकीपुर्वी दिड हजार घरांचा नवा प्रकल्प सुरु करणार- उदय सामंत

विधानसभा निवडणुकीपुर्वी दिड हजार घरांचा नवा प्रकल्प सुरु करणार- उदय सामंत

औरंगाबाद: म्हाडाच्या सदनिका सर्वसामन्याच्या आवाक्‍यात आल्यामूळे ऑनलाईन लॉटरी पद्धतीसाठी राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहेत. विधानसभा निवडणुकीपुर्वी नक्षत्रवाडी येथे दिड हजार घराची नवीन योजना सुरु करण्यात येणार आहे. आठवड्याभरात जिल्हाधिकारी आम्हाला या भागात आठ हेक्‍टर जमीन देणार असल्याचे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मंगळवारी(ता.4) सांगितले.

म्हाडातर्फे देवळाई, तिसगाव, वाळुज, पैठण येथील 917 सदनिकांची मंगळवारी म्हाडाचे अध्यक्ष उदय समंत यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने सोडवणूक झाली. यावेळी बोलाताना सामंत यांनी ही माहिती दिली. तापडिया नाट्यमंदिरात सकाळी दहा वाजेपासून या सोडविणुकीस प्रारंभ झाला. यावेळी रवीविजय वर्गीय, गृह विभागाचे माजी अधिकारी सुरेश कुमार,अंबादास दानवे, म्हाडाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे, तहसिलदार रमेश मुनलोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

917 सदनिकांसाठी 7 हजार 337 अर्ज आले होते. सामंत म्हणाले, म्हाडाचे काम करीत असताना लेखी स्वरुपापेक्षा प्रत्यक्षिक काम केल्यानंतर त्याला मोठा प्रतिसाद मिळतो, हे औरंगाबादच्या आजच्या अर्जावरून लक्षात येते. म्हाडाचा अध्यक्षपद घेतल्यानंतर मला या 917 घरे रिक्‍त असल्याचे सांगण्यात आले. हे का रिक्‍त आहे, याचा आभ्यास केला, आणि म्हाडाच्या घराच्या बाजूला होणाऱ्या नवीन घरांच्या किंमती आमच्यापेक्षा कमी होत्या. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बैठक घेत, एसआरएसची स्कीम लागू करण्याची सुचना त्यांनी दिली. मुंबईसह महाराष्ट्रातील घरांच्या किंमती कमी करता आल्या तर फार मोठे पुण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून होत एक समाधान होईल, असे सांगितले. आज म्हाडाच्या माध्यमातून कमी दरात घर देण्याची संधी मला पुन्हा मिळाली. या बैठकीपुरते मर्यादित न राहाता म्हाडाची बैठक घेतली राज्यभरातील घरांच्या 21 ते 47 टक्‍के किंमती कमी केल्या. म्हणून महाराष्ट्रातील म्हाडाच्या लॉटरीला अभुतपुर्व असा प्रतिसाद मिळाल्याचेही सामंत यांनी सांगितले. म्हाडाचे मुख्याधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी प्रस्ताविक केले. लॉटरी 101 ते 112 क्रमांकाच्या प्रकल्पाची एकामागे एक ऑनलाईन पद्धतीने जाहिर करण्यात आले. 

देवळाईच्या पाईपलाईनसाठी दोन कोटी रूपये 
देवळाई येथील म्हाडाच्या सदनिकासाठी 600 लोकांसाठी पाण्याचा प्रश्‍न मिटवण्यासाठी नळपाणी योजना राबविण्यात येणार आहे. या लोकांना दुखवणार नाही. अशी आमची नितिमत्ता नाही, सहाशे लोकांसाठीह दोन कोटी रूपयांची ही योजना मी आजच मंजुर झाल्याचे जाहिर करतो, असे सांगत उदय सामंत यांनी म्हाडाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी तात्काळ प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले.

ऑनलाईन मुळे पारदर्शकता 
म्हाडावर सर्वसामन्याचा विश्‍वास आहे. तो आणखी दृढ करण्यासाठी आम्ही मानवी हस्तक्षेपामूळे होणारी लॉटरी ऐवजी ऑनलाईन लॉटरी पद्धत अवलंबली. पुण्यात याचा पहिला प्रयोग झाला. त्यानंतर मुंबईत झाला. आता औरंगाबादेत होत आहे. ऑनलाईन लॉटरीवर काहीनी टिका केली. ज्यांनी म्हाडावर टिका केली ते आज घरी असल्याचे सामंत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com