युवतीचे अपहरण करणाऱ्या वकिलाला तीन वर्ष शिक्षा 

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

नांदेड  : एका महाविद्यालयीन युवतीचे अपहरण करून तिला दोन दिवस डांबून ठेवणाऱ्या वकिलाला येथील जिल्हा न्यायाधिश (तिसरे) ए एस सय्यद यांनी तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा शनिवारी (ता. १८) दुपारी ठोठावली.  

नांदेड  : एका महाविद्यालयीन युवतीचे अपहरण करून तिला दोन दिवस डांबून ठेवणाऱ्या वकिलाला येथील जिल्हा न्यायाधिश (तिसरे) ए एस सय्यद यांनी तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा शनिवारी (ता. १८) दुपारी ठोठावली.  

शोभानगर भागात एका निवृत पोलिस अधिकाऱ्याची महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुलगी वजिराबाद भागात काही शैक्षणीक साहित्य खरेदीसाठी ६ नोव्हेंबर २०१३ ला आली होती. खरेदी करून ती दुपारी चिखलवाडी येथे थांबली होती. यावेळी तिच्या ओळखीचा असलेला रोशन जाकीर सादुल्ला खान पठाण (३१) रा. पीरनगर हा तिच्याजवळ आला. तिला ॲटोत घेऊन ते तेथून पुढे निघाले. परंतु पिडीत मुलीच्या तोंडाला रुमालाद्वारे काही गुंगी येणारे पावडर लावले. त्यानंतर तीला घेऊन तो हैद्राबादकडे रवाना झाला. तिथे गेल्यानंतर सिकंदराबाद आदी ठिकाणी नेले. तसेच तिच्याजवळील तिचे सर्व महत्वाचे कागदपत्र आपल्या ताब्यात ठेवले. त्यासोबतच तिच्याजवळील पाच हजार रुपये व पाच ग्राम सोन्याचे दागिणे काढून घेतले. याप्रकरणी पिडीत मुलीच्या पालकांनी वजिराबाद ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अपहरणाचा गुन्हा दाखल झाला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी मोबाईल लोकेशनद्वारे हैद्राबाद गाठले. परंतु कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या रोशन पठाण यांने हैद्राबाद सोडले. ते थेट नांदेडात येऊन जीएन एक्झीकेटीव्ह हॉटेलमध्ये तिला दोन दिवस डांबून ठेवले. त्यानंतर रोशन यांने शोभानगर भागात तिला आणून सोडले. भयभीत झालेल्या पिडीत मुलीने आपले घर गाठले. घडलेला प्रकार पालकांना सांगितला. या प्रकरणी वजिराबाद पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने आठ साक्षिदार तपासले. सध्या नांदेड न्यायालयात वकिली व्यवसाय करणाऱ्या रोशन पठाण याला तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू ॲड. नितीन कागणे यांनी मांडली. 

Web Title: The lawyer who kidnapped the girl punishment for three years