जात डोक्यातून जायला हवी - माने
परभणी - जात व्यवस्था नाकारण्याची मानसिकता आपल्यात नाही. कारण काहीही करण्यास गेल्यावर जात आडवी येते किंवा धर्म; परंतु जोपर्यंत आपल्या डोक्यातील जात निघत नाही, तोपर्यंत देशातून जात जाणार नाही, असा संदेश लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी मला दिल्याचा दाखला ‘उपरा’कार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी दिला. अण्णा भाऊ साठे यांच्यासोबत काम केल्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.लालसेनेचे पंधरावे राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन रविवारी येथील बी. रघुनाथ सभागृहात झाले. विद्रोही शाहीर सागर गोरखे, माने, संजय जाधव, धर्मराज चव्हाण, आदी उपस्थितीत होते.