raosaheb danave
raosaheb danave

नेते, मतदारांची निवडणुकीच्या दिशेने वाटचाल: रावसाहेब दानवे

औरंगाबाद : देशातील प्रत्येक घडामोडीवर जनतेचे लक्ष आहे. याच घडामोडी निवडणुकीशी जोडल्या जाणार आहे. या पुढचा काळ हा राजकीय घडामोडीचा असणार आहे. देशातील नेते,मतदार हे निवडणुकीच्या दिशेने वाटचाल करायला लागले आहेत. यामूळे तुमच्यातही निवडणुकीची रंगत येऊ द्या असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी (ता. 7) भाजप पदाधिकाऱ्यांना दिला. 

भाजपतर्फे औरंगाबाद शहर व ग्रामीण जिल्हा पदाधिकाऱ्यांची खासदार दानवे यांच्या अध्यक्षतेखाली भानुदास चव्हाण सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीतून बूथ विस्तार आणि कामकाजांचा आढावा घेण्यात आला. दानवे म्हणाले, सध्या राजकीय घडामोडीचे काळ आहे. याच घडमोडीवर लोकांचे लक्ष आहे. यामूळे यात आपण मागे पडलो तर मागे पडल्याचीही चर्चा लोक करतील. तुमच्यात उत्साह राहू द्या, निवडणुकीच्या रंगता रहा. आपले एक बुथ पंचविस युथची हे पाहून कॉंग्रेस आणि इतर अन्य राजकीय पक्षांनी एक बुथ पाच युथ आणि बैठका सुरु केल्या आहेत.

आपण हे अगोदरच गेले होते. यामूळे आपले काम 20 सप्टेंबरच्या आत संपवा असे आदेश खासदार दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. या बैठकीनंतर बुथ विस्तारक,तालुका अध्यक्ष, संघटनमहामंत्री इतर 23 सुचीचे काम करणाऱ्यांची बैठक घ्या असेही निर्देश देण्यात आले. या बैठकीस विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव,आमदार अतुल सावे, बसवराज मंगरुळे,संजय केणेकर, शिरिष बोराळकर, दिलीप थोरात, अनिल मकरिये, कचरु घोडके, रेखा कुलकर्णी, मनिषा भन्साली,उपमहापौर विजय औताडे, बाळासाहेब गायकवाड, शिवाजी दांडगे, राजगौरव वानखेडे उपस्थित होते. 

भाजप कमी होऊ दिले नाही! 
भोकरदन तालुक्‍यात मी 35 वर्षांपासून एकदाही भारतीय जनता पक्ष कमी होऊ दिला नाही. 2009 मध्ये केवळ जाफ्राबाद तालुक्‍यातील टेभुर्णी एक पराभव आणि 1985ला विधानसभेत मी एक हजार ते आकराशे मतांनी पराभूत झालो होतो. हा पराभवही सोयगाव तालुक्‍यातील सावळदबारा येथून झाला. तेव्हाही भोकरदन मधून भाजप कमी होऊ दिला नाही. याच प्रमाणे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी काम करीत पक्ष वाढीकडे लक्ष देण्याच्या सुचनाही यावेळी दानवे यांनी केल्या.

तुम्ही माझ्यासारखे कपडे शिवा! 
तालुका निहाय आढावा घेत असताना वैजापूरचे काम कमी असल्याचे दानवे म्हणाले, विधानसभेच्या उमेदवारीसाठी अनेक जण इच्छूक आहे. असे असतानाही काम मात्र कमी कसे? यामूळे तुम्ही आता माझ्यासारखे कपडे शिवा अनऊ फिरा असे उपरोधिक टोला लावला. हे एकुण वैजापुरचा अन्य जण उठला दादा मला नाही सांगितले यावर तुम्ही सगळे कपडे शिवा असे सांगितले यावर सभागृहात एकच हाशा पिकला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com