महिला सरपंचच्या पुत्राचा खून ; चार जणांवर गुन्हा दाखल 

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 2 जून 2018

नांदेड :  गावपातळीवरील ग्रामपंचायत निवडणूकीचा राग मनात धरून चार जणांनी संगनमत करून सरपंच महिलेच्या पुत्राचा खून केला. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून चार जणांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेड :  गावपातळीवरील ग्रामपंचायत निवडणूकीचा राग मनात धरून चार जणांनी संगनमत करून सरपंच महिलेच्या पुत्राचा खून केला. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून चार जणांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लोहा तालुक्यातील वाळकी (बु) येथे ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच झाली. निवडणूक प्रचारावरून गावातील दोन गटात वाद निर्माण झाला. याचा राग मनात धरुन याच गावातील भगवान नागोराव बेटकर, दिनेश माधव बेटकर, मुकिंदा ईरबा कोलते आणि विश्वांभर जळबा बेटकर या चार जणांनी संगनमत करून शेख अल्लाबल्ली महेबुबसाब (वय ४२) याचा खून करून त्याचा मृत्तदेह नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत आणून टाकला. परंतु उस्माननगर की नांदेड ग्रामीण पोलिसांच्या हद्दीवरून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाली.

अखेर नांदेड ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. परंतु सरपंच महिला मालनबी महेबुबसाब यांनी पोलिसांना खूनाचा गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. परंतु पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. अखेर मालनबी यांनी नांदेड न्यायालयात न्याय मागितला. सर्व पुरावे व वैद्यकीय अहवालावरून या प्रकरणात वरिल चारही मोरकऱ्यांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. यावरून पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. के. माने हे करीत आहेत. 

 

Web Title: ledi sarpanch son's murdered ; Four offense filed